पूर्णा (जि. परभणी) : कावलगाव (ता., जि. परभणी) शिवारात गावाचे पूर्व बाजूस गोदावरी नदीच्या पात्रात अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने वाळू माफियांवर सर्वात मोठी कारवाई करीत सुमारे बावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (ता. सात) रात्री करण्यात आली. दरम्यान, सोमवारी (ता. आठ) महसूल प्रशासनाने नदीपात्रातील बोटी ताब्यात घेत नष्ट केल्या.
काही व्यक्ती गोदावरी नदीच्या पात्रात अवैधरीत्या वाळूची चोरी करीत असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीमती राग सुधा यांना मिळाली. त्यावरून त्यांनी विशेष पथकाला कावलगाव शिवारात रवाना केले.
सदरील पथकाने रविवारी (ता. सात) सायंकाळी साडेचार वाजता छापा मारला. त्या ठिकाणाहून एक टेम्पो, दोन ट्रॅक्टर, वाळू उपसा करणारी बोट, वाळू, असा एकूण २१ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सतरा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : कोरोना काळात अंगणवाडीताई ठरल्या ‘सुपरहिट’ -
अकरा आरोपी फरार
त्यात तीन वाहन चालक, एक बोट चालक, तीन मजूर तसेच बोटीचे दहा भागीदार व मालक यांना सुद्धा आरोपी करण्यात आले आहे. सदर प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर अकरा आरोपी फरार आहेत.
१५ लाख ६० हजार ५०० रुपयांचा प्रत्यक्ष मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. रात्री अंधार असल्याने व नदीपात्रातून बोट बाहेर काढण्यासाठीची साधन सामुग्री उपलब्ध नसल्यामुळे सोमवारी बोट जप्त करण्यात येणार आहे. बोटीची पाइपलाइन व टाक्यांसह सामुग्रीची किंमत सहा लाख १८ हजार, अशी एकूण २१ लाख ७८ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा व पहा : Video : बंधपत्रित परिचारिकांचा ‘आत्मक्लेश’ -
लोखंडी बोट करण्यात आली नष्ट
सदरील कार्यवाही पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राग सुधा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत पांचाळ, सहायक फौजदार हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदीश रेड्डी, विजय घनसावांत, अतुल कांदे, गजेंद्र चव्हाण, लक्ष्मण बोडके, मोहिज पठाण, सादिक पठाण, शेख रमिज यांनी ही धडक कारवाई केली. दरम्यान, उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी सोमवारी (ता.आठ) सदरील लोखंडी बोट नदीपात्रातून बाहेर काढून महसूल कायद्याप्रमाणे नष्ट करून भंगारमध्ये टाकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.