नांदेड : रेल्वेप्रवासाच्या दरम्यान प्रवाशांची नजर चुकवून त्यांचे किंमती सामान आणि मोबाईलसह पर्स लंपास करणारा चोरटा लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी (ता. २७) रात्री अटक केला. त्याच्याकडून मोबाईल, टॅब व इतर साहित्य असा सव्वादोन लाखाचा ऐवज जप्त केला. औरंगाबाद लोहमार्ग न्यायालयात शनिवारी (ता. २८) हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले.
नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागात मुदखेड, पुर्णा, किनवट, भोकर, धर्माबाद, नांदेड रेल्वे स्थानकावर किंवा प्रवासादरम्यान बेसावध प्रवाशांच्या किंमती सामानावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांनी आपले डोके वर काढल्याने लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानानाही या चोरट्यांनी आव्हान दिले आहे. नांदेड रेल्वेस्थानकावरून अनेक प्रवाशांचे मोबाईल हातोहात पळविणारी टोळी सक्रीय झाल्याने रेल्वे प्रवाशांतही भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नांदेड लोहमार्गचे पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सतर्क केले. रेल्वेत जावून अचानक तपासणी करणे, रेल्वेस्थानकावर संशयास्पद एखादा व्यक्ती भटकत असले तर त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्याच्या सुचना दिल्या. तसेच दाखल झालेल्या गुन्ह्यातील मात्र फरार आरोपींना पकडण्यासाठी त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सुचना दिल्या.
हेही वाचा---वडापाव विक्रेत्याने पिस्तुल फेकला नदीत
मुद्देमालासह आरोपीला अटक
यावरून रेल्वे रेल्वे पोलीस स्टेशन नांदेड येथील दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू केला. यावेळी कलम 392,411,34 भा. दं. वि. मधील आरोपीकडून एक तोळे सोने, १४ मोबाईल व एक आयपॅड असा एकूण दोन लाखा १४ हजार रुपयाचा माल आरोपी बाळू गणपत गव्हाने याच्याकडून शुक्रवारी (ता. २७) डिसेंबर रोजी जप्त करून त्यास अटक करण्यात आले.
हे उघडून तर पहा---विकासकामांसाठी येथे होणार सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची ‘मेगा’ भरती
यांनी घेतले परिश्रम
सदर गुन्हा पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलींद सोनकांबळे ,पोलिस हवालदार राठोड, श्री. काळे, श्री. महाजन, जीवराज लव्हारे, श्री. कराळे, श्री. मोरचुले, क्षी. रंभाड, महिला पोलिस श्रीमती खांडेकर, श्रीमती आगाशे यांनी आरोपीचा शोध घेवून मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी आरोपी बाळू गव्हाणे याला शनिवारी (ता. २८) औरंगाबाद लोहमार्ग न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयाने बाळू गव्हाणेला दोन दिवस पोलिस कोठडीत पाठविल्याचे श्री. लव्हारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.