नागरिकांच्या मदतीला पोलिसांची हेल्पलाईन

file photo
file photo
Updated on

परभणी : ‘लॉकडाऊन’च्या काळात सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास पोलिस अश्यांना मदत करणार आहेत. त्यासाठी परभणी पोलिस दलाच्यावतीने हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत.
‘कोरोना’ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन संपूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेला घरातच थांबण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वसामान्यांना या लॉकडाऊनच्या कालावधीत कोणताही त्रास होऊ नये, किंवा त्यांना कोणाच्या मदतीची गरज भासल्यास प्रशासन तातडीने अश्या लोकांपर्यंत पोहचणार आहे. त्यासाठी परभणी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने हेल्पलाईन नंबर सुरु केले आहे.

पोलिस ठाणे निहाय नंबर
 हे नंबर पोलिस ठाणे निहाय असून आप - आपल्या भागाचे जे पोलिस ठाणे आहेत. त्या पोलिस ठाण्याचे नंबर व संबधीत अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी जाहीर करण्यात आला आहे. कुणाला काही अडचण असल्यास किंवा मदतीची गरज असल्यास पोलिसांना या हेल्पलाईन क्रमांकावर फोन केल्यास तातडीने मदत मिळणार आहे.

असे आहेत हेल्पलाईन नंबर
पोलिस अधीक्षक कार्यालय ः (०२४५२-२२६२४४), (७७४५८५२२२२,९३५६७०९०३७, ९३५६७१३३१६,
९३५६७२०२११)
नानलपेठ पोलिस ठाणे ः (०२४५२-२२०४५०), (९७६३५८०४४०),
नवामोंढा पोलिस ठाणे ः (०२४५२ - २२०१७०), (९८५०३२७९००)
कोतवाली पोलिस ठाणे ः (०२४५२ - २२१४३०) (९०२८३८५३५८)
गंगाखेड पोलिस ठाणे ः (०२४५३ - २२२०३३) (९८२३७१६१००)
सोनपेठ पोलिस ठाणे ः (०२४५३ - २४०२३८) (९४२२८७५५२२)
पिंपळदरी पोलिस ठाणे ः (०२४५३ - २६५०८५) (९८५०६३२४२४)
पूर्णा पोलिस ठाणे ः (०२४५२ - २५५१००) (९९२३४०७०५०)
चुडावा पोलिस ठाणे ः (०२४५२ - २५८१००) (८८८८८९८३२५)
पालम पोलिस ठाणे ः (०२४५३ - २७०२३५) (८७८८०१४०२०)
सेलू पोलिस ठाणे ः (०२४५१ - २२२१३३) (८२०८४०४३५९)
मानवत पोलिस ठाणे ः (०२४५१ - २४०१००) (७०३०११०१०६)
पाथरी पोलिस ठाणे ः (०२४५१ - २५५३३३) (९४२२८७२५००)
जिंतूर पोलिस ठाणे ः (०२४५७ - २२००३३) (७९७२५८२२९८)
बोरी पोलिस ठाणे ः (०२४५७ - २४२३३०) (८९७५८३२२९८)
बामणी पोलिस ठाणे ः (०२४५७ - २६१२८५) (८३०८५४३१००)
चारठाणा पोलिस ठाणे ः (०२४५७ - २७०१००) (७८८७६६४५०९)
परभणी ग्रामीण पोलिस ठाणे ः (०२४५२ - २२०६३७) (९८२३४४५४९२)
ताडकळस पोलिस ठाणे ः (०२४५२ - २५६४३२) (८८८८८१३६४७)
दैठणा पोलिस ठाणे ः (०२४५२ - २६७०३३) (९९२३६९२८९९)

या क्रमांकावर गरजु व्यक्तींनी फोन करून पोलिसांची मदत घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलिस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.