ब्राम्हणगाव परिसरातून कत्तलीसाठी जाणाऱ्या 98 जनावरांची पोलिसांकडून सुटका; तीन आरोपींसह एक पीकअप वाहन ताब्यात

कत्तलीसाठी जाणाऱ्या 98 गोवंशीय गाई, लहान वासरे यांची सुटका केली असून तीन आरोपींसह एक पीकअप वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.
Police rescued 98 animals going to slaughter from Bramhangaon area Marathi Crime news rak94
Police rescued 98 animals going to slaughter from Bramhangaon area Marathi Crime news rak94
Updated on

आडुळ ता.१५ : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशिय जातीच्या 98 जनावरांची स्थानिक गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांनी आज (दिनांक १६ जून) सकाळी सुटका केली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार. दोन ते तीन दिवसापासून पाचोड पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ब्राम्हणगावं परिसरातील डोंगराळ भागात बाहेर गावातून गोवंशीय जनावरांची संख्या वाढताना दिसून येत होती.

स्थानिक नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जून रोजी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे दिवसभर डोंगराळ भागातील कानाकोपऱ्यात लपवून ठेवलेल्या जनावरांचा आढावा घेत सापळा रचला. उशिरा रात्री सुमारे २ ते ३ वाजे दरम्यान सदरील ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजी नगर, एल सी बी, दंगा काबू पथक, आर सी पी व स्थानिक पोलीस ठाणे असे सुमारे १०० ते १५० पोलीस कर्मचाऱ्यांसह डोंगराळ भागात एकच वेळी छापा मारून कारवाई केली.

Police rescued 98 animals going to slaughter from Bramhangaon area Marathi Crime news rak94
Ravindra Waikar : ज्या मोबाईलवरुन EVM अनलॉक केलं, तोच मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याला दिला; धक्कादायक प्रकार उघड

ब्राम्हणगाव परिसराला यामुळे छावणीचे स्वरूप आले होते. कत्तलीसाठी जाणाऱ्या 98 गोवंशीय गाई, लहान वासरे यांची सुटका केली असून तीन आरोपी सह एक पीकअप वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. आढळून आलेल्या जनावरांना वैद्यकीय तपासणीसाठी १६ जून रोजी सकाळी साधारण १२ वाजे दरम्यान खाजगी वाहणाद्वारे चिकलठाणा येथे पाठवण्यात आले.

Police rescued 98 animals going to slaughter from Bramhangaon area Marathi Crime news rak94
Elon Musk EVM : इलॉन मस्क विरुद्ध भारतीय EVM; भाजपा नेत्यानं दिलं सडेतोड प्रत्युत्तर,जाणून घ्या काय आहे प्रकरण

या कारवाईत २० ते २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पोलीस निरीक्षक सतीष वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, भगतसिंग दुल्हत, दगडू जाधव, सहाय्यक फौजदार लहू थोटे, पो.ह. श्रीमंत भालेराव, संजय घुगे, दीपेश नांगझरे, वाल्मीक निकम, अंगद तिडके, नरेंद्र खंदारे, नामदेव शिरसाठ, संतोष पाटील, गोपाळ पाटील, विठ्ठल डोके, शेख कासम, दीपक सुरोसे, विजय धुमाळ, अशोक वाघ, आनंद घाटेश्वर, संजय तांदळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तसेच पोलीस ठाणे पाचोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, पो.हे.का प्रशांत नांदवे, साबळे, चव्हाण, रोकडे, काकडे, फेरोज बर्डे यांनी संयुक्त कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com