खड्डा पाहण्यास पोलिस धावले अन् निघाले...

balapur
balapur
Updated on

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली): कळमनुरी तालुक्‍यातील कुपटी शिवारात एका शेतकऱ्याच्या शेतात पाच फूट लांब व तीन फूट खोलीचा संशयास्पद खड्डा खोदल्याची माहिती बुधवारी (ता. २५) पोलिसांना समजली. पोलिसांनी घटनास्‍थळी भेट देऊन पाहणी केली असता त्‍यात कुटार भरलेले आढळून आले. मात्र, हा खड्डा कोणत्या कारणासाठी खोदला? हे मात्र गूढच असून पोलिस तपास करीत आहेत. 

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुपटी शिवारात शेतकरी किशनआप्पा व्यवहारे यांच्या शेतामध्ये पाचफूट लांब व तीन फूट खोलीचा खड्डा असल्याची माहिती वाटेकऱ्यांनी श्री. व्यवहारे यांना दिली. शेतात एवढा खड्डा खोदलेला आढळून आल्याने श्री. व्यवहारे यांनी थेट आखाडा बाळापूर पोलिस ठाणे गाठले. त्यांनी सर्व माहिती पोलिसांना दिली. 

पोलिसांची घटनास्थळी भेट

त्यानंतर पोलिस निरीक्षक विकास थोरात यांनी खड्ड्याची पाहणी करण्यासाठी पोलिसांना कुपटी शिवारात पाठविले. त्यानुसार बिट जमादार मधुकर नागरे, नागोराव बाबळे, राजेश जाधव, पंढरीनाथ चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन शेतातील खड्ड्याची पाहणी केली. या वेळी खड्ड्यात काही तरी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने खड्डा साफ करण्यास सुरवात केली.

खड्ड्याची खबर ना शेतमालकाला, ना वाटेकऱ्याला

 शेतकऱ्यांनी खड्डा साफ करण्यास सुरवात केली असता यामध्ये सोयाबीनचे कुटार आढळून आले. तीन बाय पाच फुटांच्या खड्ड्यात सोयाबीनचे कुटार आढळून आल्याने पोलिसही अचंबित झाले. शेतमालक श्री. व्यवहारे यांनीही शेतात खड्डा खोदला नाही, त्यांचे वाटेकऱ्यांनीही खड्डा खोदला नाही. तर मग हा खड्डा कोणी व का खोदला? याचे तर्क - वितर्क लावले जात आहेत. 

खड्ड्यातील माती झाली गायब

कुपटी शिवारात खड्डा खोदल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता यामध्ये वरून थोडी माती व खाली कुटार भरलेले आढळून आले. मात्र, खड्डा खोदल्यानंतर खड्ड्यातून निघालेली माती आढळून आली नाही. त्यामुळे ही माती नेमकी का काढून नेली असले? या बाबतही गावकऱ्यांतून चर्चा होत असलेली पाहावयास मिळत आहे. 


बघ्यांची मोठी गर्दी

कळमनुरी तालुक्यातील कुपटी शिवारातील शेतात तीन बाय पाच फुटांचा खड्डा कोणीतरी खोदला असल्याची माहिती गावात पसरली. त्यामुळे हा खड्डा पाहण्यासाठी पंडितराव बोंढारे, पिंटू पतंगे, बालू बोंढारे, पिंटू नरवाडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांनी गर्दी केली. प्रत्येक जण वेगवेगळा अंदाज लावत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.