Udgir Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना येणार सुगीचे दिवस

Udgir Vidhan sabha Election : उदगीर मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्त्यांना महत्त्व देत आहेत, ज्यामुळे कार्यकर्त्यांसाठी सुगीचे दिवस येणार आहेत. धनदांडग्या उमेदवारांनी राजकीय दौरे सुरू केले आहेत.
Udgir Assembly Election 2024
Udgir Assembly Election 2024sakal
Updated on

उदगीर : कोणतीही निवडणूक म्हटलं, की पाठीशी कार्यकर्ते लागणारच. निष्ठावंत व निवडणुकीपुरते काम करणाऱ्या कार्यकत्यांकडे राजकीय पक्षांच्या नेत्यांचा डोळा असतो. सध्या होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपले काम करण्यासाठी जास्तीत-जास्त कार्यकर्ते गोळा करण्याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

कार्यकत्यांनाही आता सुगीचे दिवस येणार आहेत. उदगीर हा महाराष्ट्र-कर्नाटक तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातील शेवटचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असला, तरी येथे मुंबईच्या अनेक उद्योजकांचे व धनदांडग्या उमेदवारांची दावेदारी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या निवडणुकीतून करोडो रुपयांची उलाढाल होत असते, असा आजवरचा अनुभव आहे.

या मतदारसंघात जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे प्रबळ अस्तित्व आहे. ज्या-ज्या विचारधारांसाठी राजकीय पक्ष स्थापन झाले आहेत, त्या विचारांचे मतदारसुद्धा या मतदारसंघात आहेत. अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते विखुरलेले होते; मात्र आता निवडणुकीची घोषणा होताच हळूहळू कार्यकर्त्यांतही जोश निर्माण होत असून, कार्यकत्यांवर निवडणुकीची भिस्त असल्याने राजकीय नेते कार्यकर्त्यांना महत्त्व देऊन आखाड्यात उतरविण्याच्या तयारीत आहेत.

जवळपास तब्बल महिनाभर हा निवडणुकीचा काळ असतो. या काळामध्ये कार्यकत्यांची सर्व सोय होणार आहे. त्यामुळे या भागातील हॉटेल, धाबे, बिअर बार हाउसफुल्ल असल्याचे दिसून येणार आहेत. कार्यकर्त्यांना सोनेरी दिवस आले असून, निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये होणार असल्याने उमेदवारी मिळणाऱ्या उमेदवारास तिन्ही पक्षांच्या कार्यकत्यांची सोय करावी लागणार आहे. त्यामुळे निवडणुकांपेक्षा कार्यकर्त्यांवरील खर्चाचा आर्थिक बोजा उमेदवारांवर पडणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

अवघ्या दोन महिन्यांत झाला नेता...

उदगीर विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या मुंबईतील एक धनदांडग्याने दोन महिन्यांपूर्वी लोकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने एका राजकीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते घेऊन पक्षाच्या प्रमुखाची भेट घेण्यासाठी मुंबई गाठली व उमेदवारीचा दावा पक्षासमोर उपस्थित केला. मात्र, या जागेवरील उमेदवार ठरलेला असल्याने त्याचा भ्रमनिरास झाला. पण, पैशाच्या जोरावर प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन जाण्यात तो यशस्वी झाल्याने सर्वसामान्य पक्षाच्या मतदारात अवघ्या दोन महिन्यांत पक्षाचा नेता कसा काय होऊ शकतो, याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.