विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील माजलगाव, आष्टी व बीड मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली. अशा काही अपक्षांनी केवळ प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे गणित बिघडविले असे नाही, तर त्यांच्या तोंडचे पाणीही पळविले आहे. यात माजी आमदार भीमराव धोंडे, रमेशराव आडसकर, डॉ. ज्योती मेटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप आदी प्रमुख नावे आहेत.