पोलिस बंदोबस्तात तलावाचा सांडवा फोडला, शेतकऱ्यांचा होता विरोध

किल्लेधारुर (जि.बीड) तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा पोकलेन यंत्राने फोडताना
किल्लेधारुर (जि.बीड) तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा पोकलेन यंत्राने फोडताना सकाळ
Updated on

किल्लेधारुर (जि.बीड) : शेतकऱ्यांचे (Farmer) विरोधाला न जुमानता जलसंपदा विभागाच्या (Water Resource Department) अधिकाऱ्यांनी रविवारी (ता.२५) सकाळी ९ वाजता आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडला. साठवण तलावाचे काम मागील सतरा वर्षांपासून कासव गतीने सुरू होते. यामुळे तीन कोटींची प्रशासकीय मंजुरी असलेल्या तलावाचे कामावर २७ कोटी रुपयांवर (Beed) अधिक खर्च झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी काम कसेबसे पूर्ण झाले. पुरेसा पाऊस झाल्याने पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोहोचला. तलावातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग खामगाव-पंढरपुरची उंची वाढवण्याचे कामात दोन्ही बाजूने कठडा न टाकता दर्जाहीन झाले. ते काम झाकण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) तांत्रिक माहिती न देता रस्त्याचे दोन्ही बाजुस पाणी साठल्याने भविष्यात धोका होऊ शकतो, अशी शक्यता गृहीत धरुन तलावातील पाणी दोन मीटरने कमी करण्याचे पत्र जलसंपदा विभागास दिल्यावरुन त्यांनी सांडवा फोडण्यासाठी यंत्रणा लावली.(pond wall broke in police bandobast in killedharur of beed district glp88)

किल्लेधारुर (जि.बीड) तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा पोकलेन यंत्राने फोडताना
ग्रामस्थ येईना मदतीला! मग उपजिल्हाधिकारीच उतरले पुरात

याची तालुका प्रशासनास माहीती देण्यात आली नव्हती. मात्र जागृत शेतकरी व ग्रामस्थांनी कामास विरोध करित प्रशासनास निवेदन दिली. शेवटी उपजिल्हाधीकारी नम्रता चाटे, तहसीलदार वंदना शेडोळकरसह जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करीत साठवण तलावावर जमलेल्या शेकडो शेतकऱ्यांचा विरोध पाहता तलावाचे काम चांगले झाल्याचे सांगून काढता पाय घेतला. मात्र भविष्यात कठीण प्रंसग येवुन जीवित व वित्तहानीची कल्पना जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने निवेदनकर्त्यांकडून लेखी घेत शेतकऱ्यांचा विरोधास न जुमानता सुरक्षिततेचे कारण पुढे करुन पोलिस बंदोबस्तात रविवारी सकाळी सांडवा फोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.