पोतरा(जि. हिंगोली): कळमनुरी तालुक्यातील पोतरा या गावाची शूर सैनिकांचे गाव अशी ओळख आहे. या गावाने साठ सैनिक देशसेवेसाठी दिले आहेत. देश रक्षणात दाखल होण्याची ही परंपरा अजूनही कायम आहे. युवकांबरोबर येथील एका युवतीने पुरुषाच्या खांद्याला खादा लावत देशसेवेसाठी वाहून घेतले असून भारतीय सैन्य दलात भरती होणारी पहिली महिला म्हणून मान मिळविला आहे.
पोतरा (ता. कळमनुरी) हे गाव शूर सैनिकांचे गाव म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. आतापर्यंत गावातील साठ सैनिक देशसेवेसाठी दिले आहेत. देश रक्षणासाठी लष्करात दाखल होण्याची ही पंरपरा अजूनही कायम आहे. येथे लष्करात दाखल होण्याचा पहिला मान (कै.) खंडेराव नरहरी रणवीर यांनी पटकावला आहे. त्यांनी मराठा इन्फन्ट्रीमध्ये सेवा केली आहे.
हेही वाचा - बारा हजार मजुर ८७८ कामांवर कार्यरत
सेवानिवृत्त सैनिकांची प्रेरणा
भारत-पाकिस्तान लढाईत त्यांनी बजावलेल्या गौरवपूर्ण कामगिरीनंतर ते नायब सुभेदार झाले. त्यांची प्रेरणा घेऊन गावातील अनेक युवक लष्करात दाखल झाले आहेत. आतापर्यत २५ ते ३० सैनिक सेवानिवृत्त झाले आहेत. यामुळे गावाला शूर सैनिकांचे गाव म्हणून सर्वदूर ओळखले जाते.
येथे कॅप्टन, सुभेदार, मेजर, नायक, लांसनायक, शिपाई आदी पदांवार सैन्यात काम केलेले अनेक जण सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त झालेले सैनिक स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनानिमित्त युवकांना सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांची प्रेरणा येथील एका युवतीने घेतली आहे.
३५ माजी सैनिकांचा समावेश
सध्या सुभाष मुलगीर, शिवाजी भिसे, विनोद मुलगीर, देवानंद मुलगीर, दत्ता मुलगीर, कोंडबा झुंगरे, पंतगराव कदम, शिवाजी भिसे, शंकर फरकंडे, शेख जावेद, श्रीरंग कपाटे, श्रीकांत गायकवाड, शंकर भिसे, साहेबराव रणवीर, बाळू रणवीर, स्वाती दगडू मुलगीर आदींचा यात समावेश आहे. भारत-चीन युद्ध, श्रीलंकेतील शांतीसेना, कारगील युद्धात शौर्य गाजविले आहे. सध्या गावात ३५ माजी सैनिक आहेत. दरवर्षी स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त सैनिकांचा सत्कार केला जातो. मागच्या तीन वर्षांपूर्वी स्वाती मुलगीर या युवतीनेदेखील भरतीची तयारी सुरू केली.
यावर क्लिक करा - हिंगोलीत हैवान पतीचा काळा कारनामा; पत्नीला जीवंत पेटविले
पोलिस प्रशासनातही दाखल
गावातीलच रस्त्यावर धावणे तसेच व्यायाम करणे सुरू केले होते. त्यांनतर तिने विविध ठिकाणाच्या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. अखेर सीआयएसएफ (सेंट्रल इंडस्ट्रीज सेक्युरिटी फोर्स) मध्ये भरती झाली. सध्या ती चेन्नई येथील आराकोन्नम येथील रिजनल ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षण घेत आहे. तिला या क्षेत्रात उच्च पदावर मजल मारायची असल्याचे स्वाती मुलगीर यांनी सांगितले. तसेच गावातील काही युवतीदेखील पोलिस प्रशासनात दाखल झाल्या आहेत. १९६० पासून देशसेवा करणारे सैनिक सेवेत कार्यरत आहेत. काश्मीर, आसामच्या सीमेवर गावातील सैनिक कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.