प्रधानमंत्री कुसुम योजना : शेतकऱ्यांनो फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

बनावट वेबसाईट व अॅपतून काही शेतकऱ्यांची फसवणुक
Pradhan Mantri Kusum Yojana farmers fraud from Fake website
Pradhan Mantri Kusum Yojana farmers fraud from Fake websitesakal
Updated on

लातूर : प्रधानमंत्री कुसुम योजनेून शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषीपंप खरेदीसाठी अनुदान देण्यात येत आहे. वीजेचे मोठे कालावधीचे भारनियमन तसेच अखंडित वीजपुरवठ्याला वैतागलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच सोशल मिडियातून होणाऱ्या फसवणुकीचे ग्रहण योजनेला लागले आहे. बनावट वेबसाईट व अॅपतून काही शेतकऱ्यांची फसवणुक झाल्याचे प्रकार घडताच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाने (मेडा) शेतकऱ्यांना सतर्क केले आहे. असा काही प्रकार होत असल्यास सावध होऊन संपर्क करण्याचे आवाहन मेडाचे विभागीय महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री कुसूम योजनेत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या तीन, पाच व साडेसात अश्वशक्ती (एचपी) कृषीपंपांसाठी अनुदान देण्यात येते. यात सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० तर अनुसूचित जाती व अनूसचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदान आहे. योजनेत मेडाच्या वतीने स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात आली असून त्यावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा यादी व उद्दिष्टानुसार पंप उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात उद्दिष्टाच्या तुलनेत मागणी करणारे शेतकरी मोठ्या संख्येने आहे.

याचा फायदा उठवत नेटमाफियांनी बनावट संकेतस्थळ (वेबसाईट) व अॅप तयार केले असून त्यावर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना संपर्क साधून नोंदणी शुल्क तसेच कृषीपंपांची किंमत ऑनलाईन भरणा करण्यास सांगण्यात येत आहे. सध्या बहुतांश शेतकऱ्यांकडे मोबाईल असून फेसबूक व अन्य माध्यमावर आलेल्या अशा बनावट वेबसाईट व अॅपच्या लिंकवर जाऊन काही भागात शेतकरी बळी पडले आहेत. यामुळे मेडाने शेतकऱ्यांना सतर्क केले असून खोटया व फसव्या संकेतस्थळांसह मोबाईल ॲपला भेट देऊ नये तसेच फसव्या दुरध्वनी, भ्रमणध्वनीच्या संभाषणाला, आवाहनाला बळी पडू नये तसेच अशा संकेतस्थळ व ॲपवर कोणत्याही पद्धतीने पैशाचा भरणा करु नये, असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.

तातडीने संपर्क साधा

प्रधानमंत्री कुसुम योजना ही राज्य सरकारच्या महाऊर्जा विभागामार्फत राबवण्यात येत आहे. महाऊर्जाच्या वतीने या योजनेच्या सविस्तर माहिती व ऑनलाइन नोंदणीसाठी http://kusum.Mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Componenet-Bwww.mahaurja.com हे अधिकृत संकेतस्थळ सुरू केले असून याच संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच कोणी फसवणुक करत असल्यास व अधिक माहितीसाठी मेडाच्या लातूर विभागीय कार्यालयच्या ०२३८२-२२६६८० या दूरध्वनी क्रमांकावर तसेच domedalatur@mahaurja.com या मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.