Prakash Ambedkar : ‘ओबीसी’मध्ये इतरांना स्थान नको;आंबेडकर, मतपेटीतून दाखवा ताकद

‘अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मैदानात उतरलो आहे. ओबीसी प्रवर्गात इतर समाजाचा समावेश होऊ देणार नाही.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal
Updated on

निलंगा (जि. लातूर) : ‘‘अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), ओबीसी समाजाच्या हक्कासाठी मैदानात उतरलो आहे. ओबीसी प्रवर्गात इतर समाजाचा समावेश होऊ देणार नाही. वंचित बहुजन आघाडीची ही उघड भूमिका आहे. यासाठी समाजाने मतपेटीतून आपली ताकद दाखवावी,’’ असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

आघाडीची आरक्षण बचाव यात्रा सोमवारी येथे आली. यावेळी झालेल्या सभेत ॲड. आंबेडकर बोलत होते. आंबेडकर म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणावरून सध्या गावागावांमध्ये दरी पडत आहे. सामाजिक वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. समाजामध्ये दंगल घडवून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षातील नेते कटकारस्थान करत आहेत. गावपातळीवर लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे. जरांगे यांची मागणी राजकीय आहे. धनगर, माळी, नाभिक, वंजारी या समाजाने राजकीय वाद मिटवले पाहिजेत.’’

‘‘ओबीसीं’चा चेहरा आपण राजकीय म्हणून समोर आणला नाही. ती काळाची गरज आहे. पाच लाखांपेक्षा जास्त धनगर समाजबांधव पंढरपूरला एकत्र आले होते. तेथे समाजाची ताकद दाखवण्यात आली. परंतु लोकसभा निवडणुकीत धनगर समाजातील एकालाही उमेदवारी देण्यात आली नाही, हे दुर्दैवी आहे,’’ असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.