Prakash Ambedkar: ओबीसींना राजकीय आरक्षण वाचवायचे असेल तर विधानसभेत 100 आमदार पाठवा !

Marathwada: आपण 22 जिल्ह्यात आरक्षण बचाव यात्रा काढली असून गावातील समाजात दोन गट निर्माण झाले आहेत.
Prakash Ambedkar OBC want to save political reservation, send 100 MLAs to the Legislative Assembly
Prakash Ambedkarsakal
Updated on

संजय राऊत

Latest Marathi News: जरांगे पाटलांचा प्रश्न हा राजकीय आहे त्यामुळे तो राजकीयच राहिला पाहिजे परंतु तो सामाजिक झाला असल्याने गावागावात दोन गट पडलेले आहेत सामाजिक दुरी निर्माण झाली आहे.

यामुळे भविष्यात ओबीसींना राजकीय आरक्षण वाचवायचे असेल तर ओबीसींचे 100 आमदार विधानसभेत गेले पाहिजे त्यासाठी प्रत्येक ओबीसी ने जागरूक रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Prakash Ambedkar OBC want to save political reservation, send 100 MLAs to the Legislative Assembly
Prakash Ambedkar: मनोज जरांगे पाटलांना शरद पवारांनी उभं केलय; ओबीसी उमेदवारालाच मतदान करा

व्यासपीठावर ओबीसी नेते दीपक बोर्डे वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर उपाध्यक्ष पांचाळ सविता मुंडे अलकाताई जायभाय प्राध्यापक मनोज निकाळजे दीपक डोके डॉ. प्रवीण कडूकर सुरेश गवळी यांची उपस्थिती होती.

आरक्षण बचाव यात्रेनिमित्त जाफराबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. आरक्षणाचा प्रश्न राजकीय असताना राजकारण्यांनी त्यावर तोडगा काढला नसल्याने हा प्रश्न सामाजिक झाला यामुळे आपण ही यात्रा काढली.

निवडणुकीत काय परिणाम भोगायचे ते बघू कारण राज्यात सद्यस्थितीत मनिपुर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे शरद पवारही सध्या चिंतेत आहेत. तर 1977 झालेल्या नामांतरासारखी परिस्थिती सद्यस्थितीत गावोगावी निर्माण झाली आहे. आपण 22 जिल्ह्यात आरक्षण बचाव यात्रा काढली असून गावातील समाजात दोन गट निर्माण झाले आहेत.

वंचितच्या नांदेड येथील कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. या दडपशाहीला भिण्याचे कारण नाही कारण जनतेत परिवर्तन होताना दिसत आहे राजकीय मतभेद सामाजिक होता कामा नये म्हणून सरकारचे काम चूक की बरोबर हे तपासणे सामान्य जनतेच्या हातात आहे आपल्या विचाराचे सरकार आले तर आरक्षण टिकू शकते यामुळे भविष्यात ओबीसींनी आरक्षण टिकवण्यासाठी जागरूक रहावे. आरक्षण बचाव यात्रेमुळे सत्ताधिकारी मराठ्यामध्ये घबराहट निर्माण झालेली आहे ती कायम ठेवावी लागेल.

Prakash Ambedkar OBC want to save political reservation, send 100 MLAs to the Legislative Assembly
Prakash Ambedkar : तर मनोज जरांगे शरद पवारांचा माणूस... प्रकाश आंबेडकरांचे खळबळजनक विधान, राज ठाकरेंवर टाडा लावण्याचीही केली मागणी

ठराविक समाजाने सत्तेला कैद केले आहे तिला मोकळ करण्याचं काम निवडणुकीत ओबीसी बांधवांना करावी लागेल यामुळे ओबीसींनी विधानसभेत 100 आमदार पाठवावे कारण ही लढाई आता रस्त्यावरची नसून विधानसभेतली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ पैठण यांनी केले.

विधानसभेत ठराव मंजूर व ना मजूर करायला किमान 145 आमदार लागतात. यामुळे ओबीसींनी 100 आमदार निवडून दिले तर एससी एसटीचे आरक्षित जागेवरील 57 आमदार निवडून येतील यामुळे विधानसभेत ओबीसींच्या विरोधात ठराव घेतला जाणार नाही यामुळे ओबीसींनी झाडून पुसून वंचितला मतदान करावे. महाराष्ट्रातील सत्ता 159 कुटुंबातच आहे. जिल्ह्या जिल्ह्यातही ठराविक लोकांची सत्ता कायम असते यामुळे सत्तांचे केंद्र बदलण्यासाठी ओबीसींनी एकजूट करणे आवश्यक आहे जालना जिल्ह्याने राज्याला वेठीस धरले असल्याने ही आरक्षण बचाव यात्रा काढावी लागल्याचेही श्री आंबेडकर यांनी सांगितले.

Prakash Ambedkar OBC want to save political reservation, send 100 MLAs to the Legislative Assembly
Prakash Ambedkar : आरक्षणावर त्वरित निर्णय घ्यावा! आंबेडकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.