Paradh Police Station
Paradh Police Stationesakal

दारुड्या बापाच्या त्रासाला कंटाळून पळून गेलेला प्रसाद अखेर मंदिरात सापडला; कारागृहात बाप गेल्यावरच तो घरी येण्यास झाला तयार!

सहायक पोलिस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांनी सोमवारी (ता. 15) प्रसादचा शोध लावून त्यांच्या घरी सुखरुप पोहचविले आहे.
Published on
Summary

दारुड्या विलास पालोदे याने काही महिन्यांपूर्वी आपल्या बापाला (मृत) सुभाष पालोदे यांना घराच्या गच्चीवरून खाली फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, हे मुलगा प्रसाद याने हे बघितले होते.

पारध : बाप दारू पिऊन आला की मला, बहिणीला, आई आजी, आजोबा यांना मारहाण करायचा. घरात सारखे भांडण, तंटा होत असल्यामुळे या नेहमीचाच त्रासाला कंटाळून जिल्हा परिषद शाळेत (Zilla Parishad School) सातवीत शिकणारा 13 वर्षाचा प्रसाद विलास पालोदे हा कोणाला न सांगता घरातून निघून गेला होता. तर, बाप विलास पालोदे व घरातील इतरांना मुलगा दीड महिन्यांपासून गायब असताना कुठे गेला, काय करतो, याची काहीच माहिती नव्हती.

अखेर पारध पोलीस ठाण्याचे (Pardh Police Station) सहायक पोलिस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांनी सोमवारी (ता. 15) प्रसादचा शोध लावून त्यांच्या घरी सुखरुप पोहचविले आहे. याविषयी माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील विलास सुभाष पालोदे हा सतत दारु पिऊन घरातील सदस्यांना मारहाण करायचा. त्यांच्या धाकाने घरातील सर्वच त्रस्त होते, तर नेहमीच्याच त्रासाला कंटाळून त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा प्रसाद पालोदे हा कोणाला काहीच न सांगताच दीड महिन्यापूर्वी घरातून निघून गेला होता. याची माहिती गावातील,नातेवाईकांना सुध्दा नव्हती.

Paradh Police Station
Viral Video: माउलीच्या कष्टाचं झालं चीज! रस्त्यावर भाजीविक्री करून मुलाला बनविलं 'CA'; योगेशनं आईला मिठी मारली अन् डोळ्यातून पाणी..

मात्र, गेल्या आठवड्यात विलास पालोदे याने सुभाष पालोदे या आपल्या बापाचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला. त्यानंतर ही माहिती उघड झाली. त्यानंतर पारध पोलिसांनी या मुलांचा शोध लावण्याचा विडा उचलून प्रसाद पालोदे हा सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथील अंबरुषी देवस्थान येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून सहायक पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांनी प्रसादला विश्वासात घेऊन त्याला त्याच्या कुटुंबाकडे स्वाधीन करण्यात आले आहे.

दारुड्या विलास पालोदे याने काही महिन्यांपूर्वी आपल्या बापाला (मृत) सुभाष पालोदे यांना घराच्या गच्चीवरून खाली फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, हे मुलगा प्रसाद याने हे बघितले होते. तेव्हापासून विलास पालोदे त्यास जास्त मारहाण करीत होते. त्यामुळे या त्रासाला कंटाळूनच प्रसाद याने घर सोडले होते, तर आताही घरी येण्याची त्याची इच्छा नव्हती. परंतु, पोलिसांनी त्याला सांगितले की, त्याने तुझ्या आजोबांचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून केला असून, तो कारागृहात आहे हे त्याला कळल्यानंतरच तो घरी येण्यास तयार झाला.

-चैनसिंग गुसिंगे, सहायक पोलिस निरीक्षक, पारध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.