‘ऐ खुदा... बिमारी और वबासे हर इन्सान की हिफाजत फरमा’...!

file photo
file photo
Updated on

परभणी : ऐरवी रमजान ईदच्या खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची उडालेली झुंबड, लहान मुलांचे नवे कपडे घेण्यासाठी चाललेली लगबग, घर सजावटीत मशगुल झालेल्या मुस्लिम भगिनी आणि ईदच्या दिवशी लोकांनी फुलून जाणारे ईदगाह मैदान... हे यंदा काहीच दिसले नाही. कोरोना विषाणु संसर्गामुळे यंदाची रमजान ईद भितीच्या सावटाखालीच साजरी झाली. विषाणुचा संसर्ग होईल यामुळे शहरातील सर्वच मुस्लिम बांधवांनी स्वताच्या घरातच नमाज पठण करून विश्वाच्या शांतीसाठी व उत्तम स्वास्थासाठी अल्लाहकडे साकडे घातले.
कोरोना विषाणु संसर्गाच्या सावटाखाली सोमवारी (ता.२५) रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी सोशल मिडियावर फोनद्वारेच एकमेकांना शुभेच्छा देत उत्तम स्वास्थ्याची कामना केली. दरवर्षी रमजान ईद साजरी करत असतांना मुस्लिम बांधवांच्या आनंदाला पारावार नसतो. अगदी पहाटेपासूनच रमजान ईद सणाचा उत्साह वाढलेला असतो. ईदच्या आगोदर आठ दिवस खरेदीसाठी बाजारात मुस्लिम महिला, मुले व पुरुषांची  झुंबड उडालेली असते. हा संपूर्ण आठवडा म्हणजे बहरलेला बाजार व उत्साहाचा लोकांमध्ये झालेला संचार पाहून आनंदी वातावरण असते. परंतू यंदा कोरोना विषाणु संसर्गामुळे देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. त्याच बरोबर जमावबंदीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत.

चोख बंदोबस्त लावण्यात आला

याच काळात पवित्र रमजान ईद हा सण देखील आला असल्याने या काळात ईद कशी साजरी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. टाळेबंदी मुळे मुस्लिम बांधवांच्या आनंदात विरजन पडले असले तरी, सामाजिक स्वास्थासाठी मुस्लिम बांधवांनी घरात राहूनच ईद साजरी करण्याच्या प्रशासनाच्या विनंती मान दिला. ठरल्याप्रमाणे सकाळी ९ वाजता मुख्य नमाज पठण झाले. ते आप - आपल्या घरातच. त्यामुळे ऐरवी नमाज साठी गच्च भरणारे ईदगाह मैदान आज सुने सुने दिसत होते. शहरात ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

घरोघरी झाले नमाज पठण
यंदाची रमजान ईद मुस्लिम बांधवांनी सोमवारी (ता.२५) घरात राहून साजरी केली. कोरोना विषाणु संसर्गामुळे यावर्षीची ईद घरातच साजरी करावी असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले होते. त्यास प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी स्वताच्या घरात मुख्य नमाज अदा करून ईदच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. कोरोना विषाणु संसर्गानंतर देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे. यामुळे सर्व व्यवसाय बंद आहेत. तसेच जमावबंदीचे आदेश असल्याने कुणालाही घराच्या बाहेर पडण्यास परवानगी नाही. या कोरोना संसर्गाच्या वातावरणात आलेल्या रमजान ईद साजरी करण्यासाठी प्रशासनाने नियमावली आखून दिली होती. यात प्रामुख्याने मुस्लिम बांधवानी नमाज पठणासाठी एकत्र जमू नये असे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी स्वताच्या घरातच ईदचे मुख्य नमाज पठण केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.