परभणीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

file photo
file photo
Updated on

परभणी : परभणी जिल्ह्यात बुधवारी (ता.२५) रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावत रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान केले आहे. ‘कोरोना’मुळे काढणी रखडली असून पावसामुळे पिकांची नासाडी झाली आहे. १५ दिवसात दुसऱ्यांदा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात वातावरणात बदल झालेला आहे. पहाटे गारवा आणि दिवसा उकाडा राहत असल्याने साथीच्या आजारात वाढ झाली आहे. तसेच पावसाळी वातावरण तयार होऊन अधुन-मधुन हलक्या सरी कोसळत आहेत. बुधवारी सायंकाळी सेलु, पाथरी तालुक्यात जोरदार अर्धा तास पाऊस झाला. पालम, गंगाखेड तालुक्यात हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर रात्री १० वाजता परभणी शहर आणि तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सोबतीला विजांचा कडकडाट होता. जोरदार वारे वाहु लागल्यानंतर काही वेळात पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास पाऊस पडला.


फांद्या पडल्यामुळे वीजपुरवठा खंडीत
वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. काही भागात रात्री १२ वाजता वीजपुरवठा सुरु झाला तर वसमत रस्त्यावरील शिवराम नगर परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा सुरु झाला होता. आधीच उकाडा त्यात विज नसल्याने नागरिकांचे आणि लहान मुलांचे हाल झाले. सकाळी आठ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. जिल्ह्यात एकुण १.२५ मिलीमटर पावसाची नोंद झाली आहे. याआधी मागील आठवड्यात गारपीट झाली होती. आता पुन्हा पाऊस झाल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

हरभरा, ज्वारीचे नुकसान
वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे हरभरा, ज्वारी आडवी झाली आहे. परभणी तालुक्यात झरी, पोखर्णी, मांडाखळी, असोला या शिवारात मोठे नुकसान झाले आहे. सेलु, पाथरी तालुक्यातदेखील ज्वारीचे पिक अडवे झाले आहे. तसेच झरी परिसरात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - ‘लॉकडाऊन’ने चिमुकला दुरावला आई -वडीलांपासून

 ‘कोरोना’मुळे रखडली कामे
जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी, हरबरा, गहु या पिकांची काढणी सुरु असताना ‘कोरोना’ विषाणुचे संकट आल्याने मजुरवर्ग शेतात येण्यास तयार नाही. तसेच यंत्रे देखील जागेवरच ठप्प झाली आहेत. त्याचा परिणाम म्हणून रब्बी हंगामातील पिके जजागेवरच खराब होत आहेत. घरच्या घरी शेतकरी कापनी करु लागले आहेत. मात्र, मळणीयंत्र चालक शेतात येण्यास तयार नसल्याने काढणी अभावी पिके शेतात आहेत. त्यात अवकाळी पाऊस येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

विजेचा लंपडाव
परभणी शहरात बुधवारी रात्रभर विजेचा लंपडाव सुरु राहीला.अनेक भागात वीजपुरवठा रात्रभर खंडीत होता.तर काही भागात सतत ये-जा सुरु होती. गुरुवारी दिवसभभर देखील विजेचा लंपडाव सुरु राहीला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.