Udgir : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा उदगीर येथील कार्यक्रम लांबणीवर;क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

शहरात उभारण्यात आलेल्या बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवारी (ता.३० ) होणार होता
Udgir
Udgir sakal
Updated on

सचिन शिवशेट्टे

उदगीर (जि.लातूर ) : शहरात उभारण्यात आलेल्या बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवारी (ता.३० ) होणार होता .या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस , मुख्यमंञी एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस, अजित पवार , केंद्रीय मंञी रामदास आठवले यांची उपस्थिती राहणार असल्यामुळे कार्यक्रमासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर काम चालु होते.

मात्र राष्ट्रपती यांचा पूर्वनियोजित महाराष्ट्र दौरा हा कोल्हापूर व पुणे येथील पुरसदृश्य परिस्थिती आणि मुंबई येथील मुसळधार पाऊस असल्याकारणाने पुढे ढकलण्यात आल्याचे राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून कळविण्यात आले आहे. मात्र लवकरच पुढील तारीख कळवण्यात येणार असुन त्यानुसार उदगीरच्या बुध्द विहाराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटा माटात होणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com