पांढऱ्या सोन्याला दहा हजार रुपयांचा भाव

वरूड बुद्रुक : शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
पांढऱ्या सोन्याला दहा हजार रुपयांचा भाव
पांढऱ्या सोन्याला दहा हजार रुपयांचा भाव
Updated on

वरूड बुद्रुक : पांढरे सोने (White Gold) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला (Cotton) बाजारात दहा हजारांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) भाववाढीच्या प्रतीक्षेत कापूस विकला नव्हता, त्यांना या भाववाढीचा चांगलाच लाभ मिळाला आहे.

पांढऱ्या सोन्याला दहा हजार रुपयांचा भाव
उद्योजकांचा सूर, औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळाला मेट्रोचा होईल फायदा

भोकरदन तालुक्यातील वरूड बुद्रुक परिसरात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात आली होती. परंतू निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस उतारा कमी आला आहे. परिसरात सुरुवातीला वेळोवेळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळवून देईल असे वाटत होते. मात्र असे असतानाच सप्टेंबरच्या मध्यात अतिवृष्टी झाल्यामुळे कापसाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. यामुळे पंधरा क्विंटल कापसाची शक्यता असणाऱ्या शेतकऱ्यांना अवघे दोन ते तीन क्विंटल कापसाचे उत्पन्न मिळाले. दरम्यानच्या काळात कापसाची मागणी कमी झाली, त्यामुळे कापसाचे भाव पडले. सध्या कापसाला चांगला दर मिळताना दिसत आहे.

विशेषतः आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढली आहे. त्यामुळे सध्या कापसाला क्विंटलमागे दहा हजार दोन शे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. शेतकरी असेल तेवढा कापूस विक्रीला काढीत आहेत.

पांढऱ्या सोन्याला दहा हजार रुपयांचा भाव
उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार, की केजरीवालांची ऑफर स्वीकारणार? लवकरच स्पष्ट

कापसाला दहा हजार रुपयांचा भाव आहे. मका, सूर्यफूल,बाजरी कुठलेही पीक घ्यायचे तर खर्चही निघणार नाही, त्यामुळे मी फरदड घेण्याचे ठरवले. त्यामुळे दोन पैसे मिळण्याची आशा आहे.

- ज्ञानेश्वर वाघ, शेतकरी, वरूड बुद्रुक

दोन महिन्यांपासून कापूस घरात साठवून ठेवला होता. चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत होतो. आता दहा हजार दोनशे रुपये भाव झाल्याने मी कापूस विक्रीसाठी दिला आहे.

- रंगनाथ वाघ, शेतकरी, वरूड बुद्रुक

- कृष्णा वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.