जातेगाव (जि. बीड) : आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतमजूर कुटुंबातील २६ वर्षीय युवकाने चिंचेच्या झाडाला शर्टच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बीडमधील गेवराईत उघडकीस आली. मृत युवकांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास तांड्यातील काहीनी विरोध केल्याने नातेवाईकांकडून तब्बल चार तास मृतदेह रस्त्यावर ठेवून ठिय्या मांडला. पोलिसांच्या मदतीने सदरील युवकांवर काल दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.