Phulambri News : फुलंब्रीला उपसा जलसिंचनतून सिंचनासाठी पाणी द्या; किशोर बलांडे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

फुलंब्री तालुका हा कायम दुष्काळाच्या छायेत आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाच्या पाण्याची दरवर्षी मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावते. शेतीसाठी पाणी उपलब्ध राहत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहे.
provide irrigation water to phulambri through suction irrigation Kishore balande demand to cm eknath shinde
provide irrigation water to phulambri through suction irrigation Kishore balande demand to cm eknath shindesakal
Updated on

फुलंब्री : फुलंब्री तालुका हा कायम दुष्काळग्रस्त असल्याने जायकवाडी प्रकल्पातून उपसा जलसिंचनाच्या माध्यमातून तालुक्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्या अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शुक्रवारी (ता.तीन) निवेदनाद्वारे केली आहे.

फुलंब्री तालुका हा कायम दुष्काळाच्या छायेत आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तसेच सिंचनाच्या पाण्याची दरवर्षी मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावते. शेतीसाठी पाणी उपलब्ध राहत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहे.

त्यामुळे फुलंब्री तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. तालुक्यात सुमारे 56 हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची लागवड केली जाते. परंतु शेतकऱ्यांना निसर्गाची साथ मिळत नसल्याने कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाने शेतकरी होरपळून निघत आहे. यावर्षी अर्धा पावसाळा संपला तरी नदी नाले विहिरी कोरड्या आहे.

provide irrigation water to phulambri through suction irrigation Kishore balande demand to cm eknath shinde
Phulambri News : पिसाळलेल्या वानराने केले दहा जणांना जखमी; बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

त्यामुळे सिंचना बरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी येथील प्रकल्पातून उपसा जलसिंचन अंतर्गत फुलंब्री तालुक्यात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, जायकवाडी प्रकल्पातून फुलंब्री तालुक्यात जलसिंचन उपसा अंतर्गत पाणी उपलब्ध करून दिल्यास शेतकरी समृद्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावायला तशी मागणी माजी सभापती किशोर बलांडे यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

provide irrigation water to phulambri through suction irrigation Kishore balande demand to cm eknath shinde
Beed Crime : गोठवलेले बॅंक खाते पुर्ववत करण्यासाठी सायबर ठाण्यातील पोलिसाकडून अडीच लाखांच्या लाचेची मागणी

फुलंब्री तालुक्यात सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पातून उपसा जलसिंचन अंतर्गत पाण्याची सुविधा करून दिल्यास शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल. आणि शेतकरी समृद्ध होईल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

- किशोर बलांडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.