PSI Exam Result : शेतकऱ्याची मुलगी पोलिस उपनिरीक्षकपदी

शेतकऱ्याच्या मुलीचे पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश.
Poonam bobade
Poonam bobadesakal
Updated on

जायकवाडी - पैठण तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्याच्या मुलीची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. या यशाबद्दल तिचा व कुटुंबीयांचा रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास भुमरे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. सहा) सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भुमरे म्हणाले, ग्रामीण भागातील पुनम बोबडेने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कठीण परीक्षेत यश संपादन केले. तिचा आदर्श इतरांनी घेऊन यश संपादन करावे.

यावेळी खरेदी-विक्री संघाचे संचालक अंकुश बोबडे पाटील, चेअरमन अर्जुन बोबडे, ग्रामविकास अधिकारी सागर डोईफोडे, नवगावचे सरपंच किशोर चौधरी, माजी उपनगराध्यक्ष शहादेव लोहारे, कृष्णा बोबडे, चंद्रभान जगताप, यशवंत नरवडे, परमेश्वर बोबडे, रामेश्वर बोबडे, शिवाजी बोबडे, भगवान सोनवणे, संतोष सोनवणे, संदीपान शिंदे, कल्याण बोबडे, सुभाष शेळके, माणिक मिसाळ, उपसरपंच राजू मोहिते उपस्थित होते.

मी शेतकरी कुटुंबातील असून आईवडील व गुरुजनांनी शिक्षणासाठी लहानपणापासून प्रोत्साहन दिले. यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकले. याप्रमाणेच मुलींना शिक्षणासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रोत्साहन द्यावे.

- पूनम बोबडे, पोलिस उपनिरीक्षक

सर्वसाधारण परिस्थितीतही येणाऱ्या अडचणीला सामोरे जाऊन मुलीने प्राप्त केलेल्या यशाचा सार्थ अभिमान वाटतो. पालकांनी मुलगा-मुलगी असा भेद न करता मुलांप्रमाणे मुलींनाही स्पर्धा परीक्षेच्या प्रवाहात आणावे.

- कृष्णा बोबडे, वडील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.