हिंगोली : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ, सीसीआय, खासगी बाजार, थेट पणन परवानाधारक व बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांकडून १७ हजार ६८२ शेतकऱ्यांकडून चार लाख १४ हजार २७२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनी दिली.
जिल्ह्यात बुधवारपर्यंत (ता.१७) चालू हंगामात कापसाची कापूस पणन महासंघ, सीसीआय, खासगी बाजार, थेट पणन परवानाधारक व बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोनाने रोखली ‘जलयुक्त’ची १३३ कामे -
सीसीआयकडे अडीच लाख क्विंटल कापूस विक्री
यात कापूस पणन महासंघाकडे दोन हजार ७१३ शेतकऱ्यांनी ५६ हजार ३७० क्विंटल कापूस विकला आहे. सीसीआयकडे नऊ हजार ५५५ शेतकऱ्यांनी दोन लाख ६१ हजार ३२३ क्विंटल कापूस विकला आहे.
थेट पणन परवानाधारकांकडे विक्री नाही
खासगी बाजारात दोन हजार ३६० शेतकऱ्यांनी ४९ हजार ७१० क्विंटल, थेट पणन परवानाधारकांकडे कोणत्याही शेतकऱ्यांनी कापूस विक्री केलेली नाही. तर बाजार समितीमधील अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांकडे एक हजार ५४ शेतकऱ्यांनी ४६ हजार ८७० क्विंटल कापूस विकला आहे.
वसमत येथील जिनिंग नादुरुस्त
जिल्ह्यात आजपर्यंत १७ हजार ६८२ शेतकऱ्यांनी चार लाख १४ हजार २७२ क्विंटल कापसाची विक्री केली आहे. दरम्यान, वसमत येथील खरेदी केंद्रातील जिनिंग नादुरुस्त असल्याने सीसीआय खरेदी बंद असल्याचे श्री. मैत्रेवार यांनी सांगितले.
९६ हजार पीककर्ज खाती अपलोड
हिंगोली : जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत गुरुवारपर्यंत (ता.१८) बँकेकडे ९६ हजार ५३४ शेतकऱ्यांची खाती वर्ग करण्यात आली असून ३९५ कोटी १६ लाख रुपये वितरित झाले आहेत.
येथे क्लिक करा - अजबच... शाखा नसलेल्या बॅंकेला जोडले गाव -
६६ हजार ३२ खाती आधारप्रमाणीकरण
यात ८७ हजार ५०० विशिष्ट क्रमांकासह असलेल्या कर्ज खात्यांचा समावेश आहे. तर अधार प्रमाणीकरण झालेली ६६ हजार ३२, आधार प्रमाणीकरण शिल्लक असलेली २१ हजार ४६८, तक्रार असलेली एक हजार २४९, डीएलसीद्वारे तक्रार निवारण झालेली ८६ खाती आहेत.
३९५ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम वितरित
तसेच ५४० खाती डीएलसीकडे तक्रार निवारणासाठी प्रलंबित आहेत. तहसीलदारांमार्फत तक्रार निवारण झालेली ३८३ खाती असून तक्रार असलेली २४० खाती प्रलंबित आहेत. आतापर्यंत ३९५ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम वितरित झाली असल्याची माहिती जिल्हा उपनिंबधक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.