Beed News : रेल्वे पुलाखालील रस्त्याला तळ्याचे रूप; पालवण चौकातील पुलाच्या ठिकाणी पादचाऱ्यांसह वाहनचालकांची कसरत

धानोरा रोडवर पालवण चौकाच्या पुढे असणारा रेल्वेचा पूल केवळ शोभेची वस्तू बनला असून त्याचा कुठलाही उपयोग होताना दिसत नाही. मागील आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाचे जवळजवळ तीन ते चार फूट खोल पाणी आजही साचलेले आहे.
Beed News : रेल्वे पुलाखालील रस्त्याला तळ्याचे रूप; पालवण चौकातील पुलाच्या ठिकाणी पादचाऱ्यांसह वाहनचालकांची कसरत
Beed News : रेल्वे पुलाखालील रस्त्याला तळ्याचे रूप; पालवण चौकातील पुलाच्या ठिकाणी पादचाऱ्यांसह वाहनचालकांची कसरतsakal
Updated on

बीड : शहरातील धानोरा रोडवर पालवण चौकाच्या पुढे असणारा रेल्वेचा पूल केवळ शोभेची वस्तू बनला असून त्याचा कुठलाही उपयोग होताना दिसत नाही. मागील आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाचे जवळजवळ तीन ते चार फूट खोल पाणी आजही साचलेले आहे. धानोरा, वरवटी गावकऱ्यांसाठी, तसेच याठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठी अडचण होत आहे.

धानोरा रोड या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावर रेल्वे विभागामार्फत एक पूल बांधण्यात आलेला आहे. या पुलाच्या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा अजूनही निचरा होत नाही. म्हणजे रेल्वेने बनवलेल्या पुलामध्ये पाण्याची निचरा व्यवस्थाच झालेली नाही, हे लक्षात येते.

हे बांधकाम करताना कोणते तज्ज्ञ अभियंते होते हाही प्रश्न उपस्थित होत आहे. सतत पाणी राहिल्यामुळे या पुलाच्या ठिकाणी आजूबाजूने शेवाळ निर्माण झालेले आहे. गुडघाभर पाणी त्यात खाली जमलेले शेवाळे त्यामुळे याठिकाणहून वावरणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेली आहे.

मागील अनेक दिवसांपासून रेल्वे विभागाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. बीड-परळी रेल्वेमार्ग लवकरात लवकर व्हावा, अशी मागणीही होत आहे. मात्र कामे पुलाची कामे करताना पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था न केल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुलाखाली जाण्या-येण्यासाठी जे रस्ते बनवलेले आहेत तेथे पाण्याच्या समस्येमुळे पुलाखाली तळ्याचे स्वरूप आल्याचे दिसून येत आहे. पाणी निचरा करून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.

आम्ही सकाळी रोज मॉर्निंग वॉकसाठी या रस्त्याने जातो. पण, पुलाखालील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेले असते. त्याकडे कोणीही लक्ष देत नसून निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

— सुनंदा शिंदे, रहिवासी, पालवण चौक.

पुलाखालील रस्त्यावर सतत पाणी साचून शेवाळे तयार झाले आहे. त्यामुळे छोट्या दुचाकी घसरण्याचा धोका आहे. किरकोळ अपघातही झाले आहेत. प्रशासनाने पाणी साचणार नाही, यासाठी नाली काढावी.

— आकाश सगळे, दुचाकीचालक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.