Marathwada Rain: या महत्वाच्या कारणामूळे यंदा मराठवाड्यात पाऊस नाही, वाचा काया आहे तद्यांचे मत!

Latest Marathwada Rain Update: जूनमध्ये ओढ, मराठवाड्यातील जिल्ह्यांत भरले पावसाचे कमी दिवस
Marathwada Rain: या महत्वाच्या कारणामूळे यंदा मराठवाड्यात पाऊस नाही, वाचा काया आहे तद्यांचे मत!
Marathwada Rainsakal

Chatrapati Samjabhaji Nagar: जून संपत आला. पण, अजूनही सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे. यंदा नैऋत्य मोसमी वारे मुंबईकडून आल्याने मराठवाड्यात पर्जन्यछाया प्रदेशाच्या प्रभावामुळे या महिन्यात मॉन्सूनचा मोठा खंड पडल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

मराठवाड्यात मॉन्सूनच्या सुरवातीला जोरदार पाऊस आला. त्यावेळी हा असाच बरसत राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाने मध्येच खंड पडला. ढगाळ वातावरण आणि पावसाचा थोडासा शिडकाव असेच पावसाचे नंतरचे स्वरुप आतापर्यंत राहिले आहे. अपेक्षित सरासरीपेक्षा जास्त पाऊस भलेही झाला असेल. मात्र, त्यात सातत्य नाही. मराठवाड्यात १ जूनपासून २८ जूनपर्यंत छत्रपती संभाजीननगर जिल्ह्यात ६ दिवस पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यात ४, बीड, ६, लातूर ७, धाराशिव ७, नांदेड ५, परभणी ४, हिंगोली ३ पावसाचे दिवस मोजले गेले आहेत.

----

पावसात खंड पडल्याचे कधी म्हणतात?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख तथा हवामानाचे अभ्यासक डॉ. मदन सूर्यवंशी म्हणाले, ‘‘१० मिलिमीटर पेक्षा पडणारा पाऊस हा काही पर्जन्य दिवस नसून १० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर तो पर्जन्यदिवस समजला जातो. सलग १५ दिवसांत एकदाही १० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला नाही तर मॉन्सूनमध्ये खंड समजला जातो. त्यामुळे सध्या तसे म्हणता येणार नाही.

----

नैऋत्य वाऱ्याच्या दोन तऱ्हा

डॉ. मदन सूर्यवंशी यांनी सांगितले, ‘‘भारतीय नैऋत्य मॉन्सूनच्या दोन तऱ्हा आहेत. त्यात मॉन्सूनचा एक भाग पूर्वेला व एक भाग पश्चिमेला जातो. यावेळी प्रारंभीचा मॉन्सूनचा पहिला झोत मुंबईकडून अरबी समुद्रातून आला आणि तो सह्याद्रीला अडकला. जे जास्त पाण्याचे ढग होते त्यांचे सांद्रीभवन होऊन तिथे पाऊस झाला. जे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरून येणारे पाणी असणारे हलके ढग पुढे सरकले, तेव्हा वर एक विशिष्ट कोन तयार होऊन ते पुढे गडचिरोली किंवा विदर्भात पाऊस देतात. सह्याद्री आणि जिथे सह्याद्रीवरून पुढे सरकत येणारे पाण्याचे हलके ढग निघून पुढे जिथे कुठे जमिनीवर बरसतात. त्याच्या मधल्या भागाला पर्जन्यछायेच्या प्रभावाखालील क्षेत्र समजला जातो. या महिन्यात मराठवाड्यात पर्जन्यछायेच्या प्रभावाखालील क्षेत्र निर्माण झाल्याने पाऊस पडला नसल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटक, गोव्यातून मध्य महाराष्ट्रात मॉन्सून आला तर मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडतो, असेही ते म्हणाले.

.....

जिल्हानिहाय २८ दिवसांतील पाऊस

--

० छत्रपती संभाजीनगर ः चार जूनला १२.४ मिलिमीटर, पाच जूनला १६.८ मिलिमीटर, १० जूनला ६०.०१, ११ जूनला १९.२, १५ जूनला ११.०१ आणि २४ जूनला १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

---

०जालना जिल्हा ः चार जूनला १२.४ मिलिमीटर, १० जूनला ४२.३, ११ जूनला ४३.३, १५ जूनला १४.५, असा चार दिवस पाऊस झाला आहे.

---

बीड जिल्हा ः ४ जूनला १२.३, ७ जूनला १९.५, ९ जूनला १५.७, १० जूनला १८.८, ११ जूनला २९.२, १७ जूनला १८.७

---

लातूर जिल्हा ः ३ जूनला ११.८, ६ जूनला १२, ७ जूनला १५.२, ९ जूनला १२.४, ११ जूनला ६३, १२ जूनला १३.१, १७ जूनला १३.२.

---

धाराशिव जिल्हा ः ७ जूनला १५.४, ९ जूनला २१.५, १० जूनला १६, ११ जूनला ४८.४, १२ जूनला ३२.१, १४ जूनला १०.४, २४ जूनला १२.

---

नांदेड जिल्हा ः ११ जून १०, १४ जून १२.१, १७ जून १७.९, २२ जून ११.८, २४ जून १२.८

---

परभणी जिल्हा ः ११ जून २३.८, १५ जून १५, १७ जून २८.८, २२ जून ११.९

---

हिंगोली जिल्हा ः १२ जून २६.३, २२ जून २४.१, २८ जून ११.७

......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com