मंठा (जि.जालना) - एनएसयूआय, युवक काँग्रेस, प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने संघटनात्मक कार्य, जिल्ह्यातील पक्षांतराच्या लाटेतही काँग्रेसशी असलेली एकनिष्ठतेचे फळ येथील राजेश राठोड यांनी मिळाले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार पक्षाचे महासचिव मुकुल वासनिक यांनी त्यांचे नाव शनिवारी (ता.नऊ) निश्चित केले.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे अनेक नावे चर्चेत होती. काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या, पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे, बंजारा समाजातील राजेश राठोड यांना उमेदवारी मिळाली.
हेही वाचा : मंठ्याच्या प्राध्यापकांचे ऑनलाइन ज्ञानदान
राजेश यांचे वडील धोंडिराम राठोड हे २००२ ते २००८ या कालावधीत राज्यपाल नियुक्त आमदार होते; तसेच त्यांनी पक्षाचे सचिव, सरचिटणीस, जनरल सेक्रेटरी, भटक्या व विमुक्त जाती विभाग राज्य अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य; तसेच सात राज्यांत विधानसभा पक्ष पक्षीनिरीक्षक म्हणून काम केले आहे.
हेही वाचा : जालन्याला यायचंय, या लिंकवर करा अर्ज
राजेश राठोड हे जिल्हा परिषदेत तीन वेळा निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापतिपदावरही ते होते; तसेच त्यांनी एनएसयूआयचे जिल्हा अध्यक्ष, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष आदी पदे भूषवली आहेत. राठोड यांना उमेदवारी मिळताच येथील बंजारा समाजबांधवांनी आनंद व्यक्त केला.
राजेश राठोड यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने युवक काँग्रेसच्या एका सच्च्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला आहे. काँग्रेस समितीने बंजारा समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे. याबद्दल पक्षाचे आभार व राजेश राठोड यांना शुभेच्छा.
- राजाभाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.