औरंगाबादचा औरंगजेब माझ्या मागे लावून दिला, दानवेंचा खोतकर व सत्तारांवर टीका

'मी माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळ जालन्यासाठी काय काम केलं याचं फलक लावू शकतो.'
Raosaheb Danve, Abdul Sattar And Arjun Khotkar
Raosaheb Danve, Abdul Sattar And Arjun Khotkaresakal
Updated on

जालना : समोरासमोर टीका करण्याची हिम्मत नसल्याने त्याने औरंगाबादचा औरंगजेब माझ्या मागे टीका करण्यासाठी लावून दिला आहे, असे म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेनाचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. दानवे हे बुधवारी (ता.२५) जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दानवे म्हणाले, की राज्यात भाजपाची सत्ता असताना जालना शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. (Raosaheb Danve Criticize On Arjun Khotkar And Abdul Sattar In Jalna)

Raosaheb Danve, Abdul Sattar And Arjun Khotkar
तिकिटासाठी पैसे नव्हते, जीवाची पर्वा न करता तो लटकला बसच्या पाठीमागे !

मात्र, अद्यापि हे काम पूर्ण झाले नसून या निधीचा हिशोब सत्ताधाऱ्यांनी द्यावा. मी माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळ जालन्यासाठी काय काम केलं याचं फलक लावू शकतो. मात्र, काही जण मंत्री असताना त्यांनी पाच वर्षात जालन्यासाठी (Jalna) केलेल्या पाच कामाची यादी जाहीर करावी. टीका करताना त्यांची समोरासमोर येऊन टीका करावी. परंतु, समोर टीका करण्याची हिम्मत नसल्याने माझ्यावर टीका करण्यासाठी त्याने औरंगाबादचा (Aurangabad) औरंगजेब लावून दिला आहे.

Raosaheb Danve, Abdul Sattar And Arjun Khotkar
हा संविधानिक पदाचा अपमान, मोदीजी चूक दुरुस्त करा - अमोल मिटकरी

निवडणूक आल्यानंतर या दोघांनाही मी खिशात घालतो, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.