Ration : तुम्हाला, तुमचेच रेशन मिळतेय ना? पुरवठा विभागाकडून ई-पीओएस ऑनलाइन यंत्रणा सुरू

राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांचे मोबाईल नंबर, आधार क्रमांक शंभर टक्के पूर्ण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या.
Ration
RationSakal
Updated on
Summary

राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांचे मोबाईल नंबर, आधार क्रमांक शंभर टक्के पूर्ण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या.

फुलंब्री - तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातून दिल्या जाणाऱ्या रेशन धान्य वितरणात पारदर्शक प्रणाली आहे. यामुळे तुमच्या नावावर कुणी रेशनचे धान्य घेतलेले आहे का, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. यात कार्ड धारकांना किती धान्य मिळते, प्रत्यक्ष किती धान्य उचलले? याचीही माहिती मिळत आहे.

राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांचे मोबाईल नंबर, आधार क्रमांक शंभर टक्के पूर्ण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. त्यानुसार आधार सिडींगचे कामही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे. यात लाभार्थ्यांना सर्व बाबींची माहिती व पाहणी करता येत आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे धान्य आणि वितरित केलेले धान्य याची माहिती मिळत आहे.

लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिसराच व्यक्ती हे धान्य उचलू शकतो. त्यामुळे लाभार्थ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. हे सर्व गैरप्रकार टाळण्यासाठी पुरवठा विभागाने ई- पीओएस मशीनद्वारे धान्य वितरण प्रणालीचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार या मशीनद्वारे रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून मिळत आहे. त्यामुळे धान्य किती उचलले? कोणी उचललेले? या सर्व माहितीचा तपशील एका क्लिकवर मिळण्यास मदत होत आहे. पण, खेड्यापाड्यांत जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे.

ई-पीओएस मशीन म्हणजे काय?

पुरवठा विभागाकडून ई- पीओएस मशिन व्यतिरिक्त रेशनचे धान्य वितरित केले जात नाही. या मशिनवर हाताचा अंगठा जुळल्यानंतरच संबंधित लाभार्थ्याला धान्य दिले जाते.

धान्याचा पूर्ण तपशील पावतीवर

स्वस्त धान्य दुकानामार्फत लाभार्थ्यांना धान्य उचलल्यानंतर ई- पीओएस मशीनमधून पावती दिली जाते. या पावतीवर लाभार्थ्यांनी किती धान्य घेतले आणि त्याची होणारी रक्कम, याची पूर्ण माहिती पारदर्शकपणे या पावतीवर दिली जाते. त्यामुळे लाभार्थ्यांनी धान्य घेतल्यानंतर पावती घेणे गरजेचे आहे.

तक्रार सुविधा उपलब्ध

लाभार्थ्यांनी किती धान्य उचलले आणि त्याला प्रत्यक्षात कमी दिले असल्यास संबंधित बाबीची तक्रार जिल्हा पुरवठा विभागाकडे करता येते. तसेच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही तक्रार केली जाते. यासाठी लाभार्थ्याकडे २८ अंकी पावतीवरील नंबर असणे गरजेचे आहे.

वर्षभराच्या धान्याचा तपशीलही उपलब्ध

लाभार्थ्यांनी वर्षभरात किती धान्य उचलले, याची माहिती आता एका क्लिकवर शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी www.mahaepos.gov.in या संकेतस्थळावर जाण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.