Ratnaprabha Gadewar : खंबीरपणे उभारला व्यवसाय,अहमदपूर शहरातील रत्नप्रभा गादेवार यांची यशोगाथा

Ratnaprabha Gadewar : रत्नप्रभा गादेवार, अहमदपूरच्या एक जिद्दी उद्यमी, आपल्या पतीच्या अनपेक्षित निधनानंतर आपल्या कुटुंबाच्या किराणा व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी झाल्या.
Ratnaprabha Gadewar success story
Ratnaprabha Gadewar
Updated on

अहमदपूर : शहरात किराणा व्यवसायात मोठे नाव करून पंचवीस कुटुंबाचा उदरनिर्वाह ज्यांच्यामुळे चालतो, स्व कर्तृत्वावर ज्यांनी व्यवसायात व्यापक प्रगती केली. जिद्द, चिकाटी व मेहनत या गुणांनी आदर्शवत जीवन करणाऱ्या रत्नप्रभा रमेश गादेवार (वय ६७) या आहेत.

अहमदपूर शहरामध्ये वर्ष १९८५ साली रमेश गादेवार व रत्नप्रभा गादेवार या दांपत्याने किराणा व्यवसाय सुरू केला. किराणा व्यवसाय प्रगती होत असतानाच रमेश यांचे वर्ष १९९८ मध्ये अपघाती निधन झाले. रत्नप्रभा गादेवार यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी पतीच्या निधनानंतर हिंमत न हारता दोन मुलांना सोबत घेऊन किराणा व्यवसाय सुरू ठेवला.

मोठ्या अडचणीला सामोरे जाऊन २२ वर्ष किरायाच्या दुकानांमध्ये किराणा व्यवसायाची वाटचाल प्रगतीकडे त्या नेत राहिल्या. अठरा वर्षांपूर्वी त्यांनी राघवेंद्र सुपर शॉपी नावाने एक दर्जेदार किराणा दुकानाचे दालन बनवले. या व्यवसायात त्यांना दोन्ही मुलांची मोलाची साथ मिळाली. व्यवसाय करत असताना शिक्षणामध्येही कौटुंबिक प्रगती साधली. त्यांच्या तीन नाती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

रत्नप्रभा गादेवार यांनी किराणा व्यवसायामध्ये १७ महिला व ८ पुरुष असे एकूण २५ जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आपले व काही कुटुंबाचे आनंदी जीवन जगवत असताना आध्यात्मिक क्षेत्रांमध्ये ही त्या कार्यरत आहेत. आपल्या कॉलनीतील विठ्ठल मंदिर उभारण्यामध्ये मोलाचे सहकार्य त्यांनी केले आहे. दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा परिवार रत्नप्रभा गादेवार मार्गदर्शनाखाली एकत्रित कुटुंब पद्धतीचे आनंदाने राहतात.

विशेष म्हणजे रत्नप्रभा गादेवार यांनी ‘माझ्या घरची मी पाहुणी’ या पुस्तकाच्या माध्यमातून स्त्री जीवनाच्या संघर्षमय जगण्याचा पट उलगडून दाखवला आहे. अनेक स्वयंसिद्धांना या पुस्तकातून प्रेरणा देण्याचे काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.