दिलासादायक! लातुरात बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले

पाच लाख नागरिकांच्या झाली कोरोनाची तपासणी
covid 19
covid 19covid 19
Updated on

लातूर: जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख १८ हजार नागरिकांची कोरोनाची (covid 19) तपासणी झाली आहे. यात ८७ हजार ५२६ जण बाधित झाल्याचे समोर आले. यापैकी ८१ हजार ५२६ जणांनी कोरोनावर मात केली (recovery rate) आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.९४ टक्के आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची कमी होणारी संख्या दिलासादायक आहे. नागरिकांनी कोरोनाच्या संदर्भाने सुरू असलेल्या उपाययोजनांचे काटेकोर पालन केले तर आणखी ही रुग्ण संख्या कमी होणार आहे.

लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात पाच लाख १८ हजार ७३१ जणांच्या कोरोना संदर्भाने तपासणी झाली. यात ८७ हजार ५२६ जण बाधित असल्याचे समोर आले. यात एक लाख ९५ हजार ४४९ जणांच्या आरटीपीसीआर टेस्ट झाल्या. यात ३४ हजार ४१३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर तीन लाख २३ हजार २८२ जणांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट झाल्या. यात ५३ हजार ११३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात बाधित झालेल्या ८७ हजार ५२६ रुग्णांपैकी ८१ हजार ३५२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण ९२.९४ टक्के इतके आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. त्यात सध्या फक्त चार हजार २०६ रुग्णांवरच उपचार सुरु आहेत. त्यातील दोन हजार ९४५ जणांना सौम्य लक्षणे असून, दोन हजार ५६० जण घरातच राहून उपचार घेत आहेत.

covid 19
Covid 19 Lockdown| औरंगाबादेत ७९ दुकानांवर दंडात्मक कारवाई

सध्या आयसीयूमध्ये ४९४, मेकॅनिकल व्हेंटिलेटर २४, बायपॅप व्हेंटीलेटरवर २४८, मध्यम ऑक्सिजनवर ६९० तर मध्यम स्वरुपाचा आजार असलेले २९९ रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. हळूहळू आणखी ती कमी होण्याची गरज आहे. या करीता नागरिकांनी शासनाने सांगितलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.