नांदेड ः औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नांदेड जिल्ह्यातील ४३ हजार ६६७ पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. यानंतर शिल्लक राहिलेल्या मतदारांना ऑफलाइन तसेच ऑनलाइन अर्ज करता येतील, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
पात्र मतदारांना नोंदणीचे आवाहन
महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पात्र मतदारांची नोंदणीसाठी ता. एक नोव्हेंबर या कालावधीत पात्र पदवी अहर्ता, पात्र तत्सम अर्हता व्यक्तींना नमुना क्रमांक १८ मध्ये मतदार नोंदणीसाठी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके यांनी केले हाेते.
हेही वाचा ...अक्षयकुमारच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
या नोंदणीसाठी ता. एक नोव्हेंबर २०१९ या अर्हता दिनांकापूर्वी किमान तीन वर्षे अगोदर पात्र पदवी अर्हता अथवा तत्सम पात्र पदविका आदी धारण करणाऱ्या व्यक्तींनी अर्ज केले. अर्ज केलेल्या मतदारांची अंतिम मतदार यादी ता. ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
४३ हजार २९३ मतदारांची नोंदणी
जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील १६ तालुक्यांतील एकूण ४३ हजार ६६७ मतदारांनी नोंदणी केली. यात नऊ हजार ५५५ स्त्री व ३४ हजार ११२ पुरुष मतदारांचा समावेश आहे. मागील वेळी २०१३ मध्ये जिल्ह्यात ४३ हजार २९३ अर्ज दाखल झाले होते. यात पुरुष ३७ हजार ८३०, तर महिला पाच हजार ४६३ अर्जदारांचा समावेश होता.
येथेही क्लिक करा....Photos : नांदेड होती मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी ! पण...
पदवीधर मतदारांसाठी नोंदणी सुरू
अद्याप नाव नोंदणी केले नसलेल्या पदवीधर मतदारांसाठी नोंदणी सुरू आहे. यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज सादर करता येतील. पात्र नागरिकांनी http://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी अर्ज करावी. तर ऑफलाइन अर्जासंबंधित मंडळाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाव नोंदणी अर्ज सादर करताना
नमुना १८ च्या अर्जासह मूळ कागदपत्र अथवा राजपत्रित अधिकाऱ्यांकडून सांक्षांकित केलेल्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक होते. अर्जदार ज्या ठिकाणी अर्ज करेल त्या ठिकाणचा सामान्यत: रहिवासी असावा. अर्जासोबत पदवी, पदविका परीक्षेचे अंतिम गुणपत्रकदेखील ग्राह्य धरले होते. मात्र, गुणपत्रकान्वये सदर व्यक्ती पास किंवा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणित असणे आवश्यक होते. ता. एक नोव्हेंबर २०१९ या अर्हता तारखेस पदवी धारण करून तीन वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती. ज्या व्यक्तीकडे एक नोव्हेंबर २०१६ पूर्वीची पदवी असेल अशांना नाव नोंदणी करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.