रेणापूर, (जि. लातूर) - ‘मराठा समाजाने आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्याजिल्ह्यांत शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चे काढले, आंदोलने केली. या समाजाला आरक्षण मिळणे शक्य नसल्याचे मी सातत्याने सांगत आलो आहे. मात्र, आलटून-पालटून सत्ता भोगणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षण देण्याची ग्वाही दिली; पण कार्यवाही केली नाही. केवळ समाजाला झुलवत ठेवत दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केले. या समाजाला आरक्षण मिळणे अशक्य आहे,’ असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.