वसमत, कळमनुरीतील रस्ते निर्मनुष्य

Wasmat karfu
Wasmat karfu
Updated on

वसमत(जि. हिंगोली) ः येथे जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद मिळाला. शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळले. तसेच दुधवाल्यानी सकाळी सहा वाजेपर्यंत दुधाचे वाटप करून गावाकडे परतले. त्यानंतर  पोलिसांची शहरात सकाळपासूनच वाहनाद्वारे गस्‍त सुरू होती. 

दुकानदारांनी दुकाने बंद ठेवावे व नागरिकांनी घराच्या बाहेर निघू नये असे आवाहन स्‍पीकरवरून करत होते. तसेच जागोजागी पोलिस गस्त होती. बसस्थानक, रेल्वेस्टेशन, सर्व चौक एकदम शांत होते. कुठेही गर्दी नव्हती. तसेच प्रत्येकजण सोशल मीडियाद्वारे कोरोनाच्या दुष्पपरिणामाचे मॅसेज पाठवत होते. कोणीही घराबाहेर निघू नये, अशी विनंती करत होते. ग्रामीण भागातही नागरिक घरातून बाहेर निघत नव्हते. इतिहासात पहिल्यांदाच वसमत शहरात एवढी शांतता होती. 

अकोला ते पूर्णा रेल्‍वे धावलीच नाही

शहरातील नेहमी गर्दीने दरवळलेले रस्‍ते रविवारी सुमसान झाले होते. शहरातील झेंडा चौक, मामा चौक, मुख्य बाजारपेठ या वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता. नागरिकांनी स्‍वतःहून या बंदमध्ये सहभाग घेतल्याने सकाळपासूनच कोणी बाहेर पडले नाही. घरात लागणाऱ्या वस्‍तू शनिवारीच सर्वांनी जमा करून ठेवल्या होत्या. दररोज येणारे भाजी विक्रेते देखील आले नव्हते. सकाळी येणारी अकोला ते पूर्णा रेल्‍वे धावलीच नसल्याने ग्रामीण भागातून कामानिमित्त येणारे गावकरी देखील शहरात आले नव्हते. 

कळमनुरीत बंदला मोठा प्रतिसाद 

कळमनुरी : कोरोना विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.२२) जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठ व वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद राहिली. शहरातील बाजारपेठ व सर्व व्यवहार रविवारी कडकडीत बंद ठेवण्यात आले. नागरिकांनी घराबाहेर न पडतात घरात थांबणे पसंद केल्यामुळे बाजारपेठ व इतर भागात सर्वत्र शुकशुकाट होता. एरवी शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गावरून वर्दळ असते. मात्र रविवारी राष्ट्रीय महामार्गावरही वाहनांची वर्दळ नव्हती.ह
बंदबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी केले आवाहन

आगारातून सर्व बसफेऱ्या रद्द

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग निर्मनुष्य दिसत होता. बंद दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक एस. जी. रोयलावार, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, प्रतिभा शेटे, कर्मचारी सुरेश बांगर, लक्ष्मण भगत, रामचंद्र जाधव, रवि बांगर, श्री. गायकवाड, श्री. लोंढे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी नवीन बसस्थानक, जुने बसस्थानक, पोस्ट ऑफिस, चौक बाजार याठिकाणी पोलिस बंदोबस्त लावून बंद पाळण्याबाबत आवाहन केले. बंद दरम्यान जीवनावश्यक असलेल्या मेडिकल वैद्यकीय, व्यावसायिक यांची प्रतिष्ठाने सुरू होती. बंद दरम्यान आगारातून सर्व बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()