माहूर, (जि.नांदेड) ः किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनी मंगळवारी (ता. सात) माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन कोरोना संसर्गाची माहिती घेतली. अहोरात्र जिवाची पर्वा न करता मेहनत घेणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक करून त्यांच्या कार्याला सलाम केला.
मंगळवारी (ता. सात) दुपारी बारा वाजता आमदार भीमराव केराम यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. या वेळी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी विशालसिंह चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. एन. भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे, मुख्याधिकारी विद्या कदम, अधीक्षक वैजनाथ स्वामी, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र रोटे, सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघमारे, भाजप नेते विजय आमले, अनिल तिरमनवार, शिवसेनेचे शहरप्रमुख निरधारी जाधव, किनवट भाजप तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, पंचायत समिती उपसभापती उमेश जाधव, माजी सदस्य किशन राठोड, डॉ. निरंजन केशवे यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा - सेवाभावी संस्थांचा मदतीसाठी नांदेडमध्ये पुढाकार
कोरोनाच्या उपाययोजना कशा पद्धतीने करण्यात आल्या आहेत याची सविस्तर माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. एन. भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे यांनी यावेळी दिली. माहूर ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात येऊन चांगली सेवा दिली जात आहे. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जिवाची पर्वा न करता सेवा देत असल्याने त्यांचे कौतुक आमदार भीमराव केराम यांनी केले.
ग्रामीण रुग्णालयात मॉक ड्रिल
माहूर शासकीय ग्रामीण रुग्णालयात अचानक कोरोणाचा रुग्ण आला तर कशी दक्षता घेतली जावी, याचे प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) मंगळवारी घेण्यात आले. रुग्ण, रुग्णालयात आल्यानंतर स्वतंत्र वार्डात त्याची रवानगी कशी करायची, रुग्णालय, रुग्णवाहिका व परिसर कसा निर्जंतूक करायचा याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या वेळी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, गटविकास अधिकारी विशालसिंह चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. एन. भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे, मुख्याधिकारी विद्या कदम उपस्थित होते.
वाई बाजारला भेट
किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी मंगळवारी (ता. सात) दुपारच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र वाई बाजार येथे भेट देऊन कोरोना आजारासंदर्भातील रुग्णांची माहिती जाणून घेऊन उपलब्ध आरोग्य सुविधेचा आढावा घेतला. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आपल्या स्थानिक मतदारसंघात आरोग्य सुविधा, जीवनावश्यक गरजांची पूर्ती व कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गावोगावी दौरे करून गावांना भेटी देत आहेत. याच धर्तीवर प्राथमिक आरोग्य केंद्र वाई बाजारला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांच्यानंतर आमदार भीमराव केराम यांनी भेट देऊन संशयित रुग्णांची संख्या, बाहेर शहरातून आलेल्या लोकांची संख्या व त्यांच्या संदर्भात केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आदींबाबतीत वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव लहाने व आरोग्य कर्मचाऱ्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. शिवाय आवश्यक यंत्रसामग्री, औषध साठा आदींचा तुटवडा पडणार नाही. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वेळीच मागणी करण्याच्या सूचना दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.