परभणी : ग्रामपंचायतस्तरावर विविध विकास कामांची अंमलबजावणीचा आढावा आता हायटेक पध्दतीने जिल्हा परिषदेकडे सादर होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी ड्रिम्स हे ॲप तयार केले. त्याबाबत सर्व विभागप्रमुख, ग्रामसेवकांना सुचना देण्यासाठी मार्गदर्शक शनिवारी (ता.१५) शासन निर्णयाप्रमाणे नमुना परिपत्रक काढले आहे.
ग्रामपंचायतस्तरावर विकासकामे मोठ्याप्रमाणात केली जातात. वेळोवेळी या कामांचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा लागतो. ग्रामसेवक पारंपरिक पद्धतीने आपल्या विकासकामांचा अहवाल सादर करताना यामध्ये सुटसुटीतपणा व तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने कमीत कमी वेळामध्ये रिपोर्ट तयार व्हावा, सुसूत्रता निर्माण व्हावी तसेच कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अहवाल संकलनासाठी अभिनव नाविण्यपूर्ण अशी सुविधा उपलब्ध करण्याची जिल्हा परिषदेच्या विचाराधीन होती. त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी स्वत:तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईलवर ॲप विकसीत केले आहे.
हेही वाचा : Big Breaking : नांदेडात आज १८ पॉझिटिव्ह
कागदविरहीत अहवाल संकलन
‘ड्रिम्स’ नावाचे हे ॲप त्यांनी तयार करुन ते वापरण्यास सुरुवात केली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून माहिती तंत्रज्ञान (IT) इलेक्ट्रॉनिक स्वरुपात कागदविरहीत अहवाल संकलन करणे, विविध विकासकामांचा योग्य आढावा, मूल्यमापन व सनियंत्रण करणे, माहिती तंत्रज्ञान (IT) च्या सहाय्याने कमीत कमी वेळामध्ये रिपोर्ट तयार करणे, सर्व ग्रामपंचायतीच्या अहवालामध्ये एकसूत्रता निर्माण करणे, ॲपचा वापर करून कमीत कमी श्रमामध्ये अहवाल सादर करणे, सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये उत्तम संवाद प्रस्थापित करणे, शासनास सादर करावयाची महत्वाची माहिती तत्परतेने संकलित करणे, विविध सभेसाठी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांची ही ई-प्रणाली द्वारे हजेरी घेणे, माहिती, शिक्षण व संवाद (IEC) साहित्य उपलब्ध करून देणे, दैनंदिन कामकाज करताना आवश्यक सर्व शासन निर्णय एकाच क्लिकवर उपलब्ध करून देणे आदीं कामे करण्यात येणार आहेत.
हेही वाचा : परभणी ग्रीनमधून पुन्हा ऑरेंजमध्ये
कधीपासून लागू
उपरोक्त उद्दिष्टांच्या अनुषंगाने जिल्हा परिषद परभणी अंतर्गत सर्व ग्रामपंचायतीसाठीही प्रणाली सुरू करण्यात येत असून एप्रिल २०२० पासून पुढील सर्व अहवाल ड्रिम्स प्रणालीमध्ये सादर करण्यात येणार आहेत.
काय आहे ड्रिम्स प्रणाली
DREAMS प्रणाली म्हणजे DEVELOPMENT, REVIEW, EVALUATION AND MONITORING SYSTEM FOR GRAMPANCHAYATs (DREAMS) ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा आढावा, मुल्यमापन, देखरेख ठेवणारी यंत्रणा होय.
संनियंत्रण करणे सुलभ होणार
ड्रिम्स ॲप माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग करून जिल्हा परिषद परभणी अंतर्गत ग्रामपंचायत विभाग करीता तयार केले आहे. यामुळे सर्व ग्रामपंचायती अंतर्गत विकासकामांचा प्रगती आढावा घेणे, पर्यवेक्षण व संनियंत्रण करणे यामुळे सुलभ होणार आहे.
- पृथ्वीराज बी. पी. , मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
ग्रामसेवकांना प्रशिक्षण
ड्रिम्स ॲप हे वापरकर्त्यास सुलभ असून सर्वांना अहवाल सादर करण्यासाठी चांगले माध्यम आहे. ॲप तयार करत असताना अतिशय सूक्ष्म बाबींचा विचार केलेला आहे. विशेष म्हणजे हे ॲप ग्रामसेवकाचा मित्र म्हणून विकसित करण्यात आलेले आहे. ग्रामसेवकांना प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून दिले असून प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
-ओमप्रकाश यादव, ॲप विकसक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.