हिंगोलीत रिंगण सोहळा उत्साहात

संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे आतषबाजीने स्वागत
संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे पहिले रिंगण झाले.
संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे पहिले रिंगण झाले.Sakal
Updated on

हिंगोली - नरसी नामदेव येथील संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे रविवारी अग्रसेन चौकात आगमन होताच आतषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता रामलीला मैदानावर पालखीचे पहिले गोल रिंगण झाले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

आषाढी एकादशीनिमित्त संत नामदेव महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. नरसी नामदेव येथून ही पालखी आज हिंगोली शहरात दाखल झाली. पालखी रविवारी मुक्कामी आहे. अग्रसेन चौकात पालखीचे जंगी स्वागत झाल्यानंतर इंदिरा चौक, गांधी चौक, महाराणा प्रताप चौक, जुन्या नगरपरिषद या मार्गे ती रामलीला मैदानावर दाखल झाली. तेथे सायंकाळी सहा वाजता रिंगण सोहळा सुरू झाला.

टाळ- मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांकडून विठ्ठल, संत नामदेव महाराज यांचा जयघोष सुरू होता. अश्वाने फेरी मारल्यानंतर भाविकांनी त्याच्या पायाखालची माती कपाळावर लावत दर्शन घेतले. पालखी सोहळा सोमवारी पुढे मार्गस्थ होईल. दुसरे गोल रिंगण अंबाजोगाई (जि. बीड) येथे होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.