लातूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल, असा अंदाज अभिनेते रितेश देशमुख यांनी येथे व्यक्त केला. लोकांमधील उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहता लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून धीरज देशमुख हे बहुमताने निवडून येतील, असेही ते म्हणाले.