Selu News : रायगड काॅर्नरवर रस्त्याच्या कामात शहराला पाणी पुरवढा करणारी पाईप लाईन तिसर्‍यांदा फुटली

सरस्वती कंन्स्ट्रक्शन करित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५४८) बरसाले डिग्रस ते पाथरी रस्त्याच्या कामात शहरातील रायगड काॅर्नर परिसरात शनिवारी (ता.०२) रोजी शहराला जोडणारी पाण्याची मूख्य लाईन तिसर्‍यांदच फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.
road construction work water pipeline burst third time selu
road construction work water pipeline burst third time seluSakal
Updated on

सेलू : सरस्वती कंन्स्ट्रक्शन करित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५४८) बरसाले डिग्रस ते पाथरी रस्त्याच्या कामात शहरातील रायगड काॅर्नर परिसरात शनिवारी (ता.०२) रोजी शहराला जोडणारी पाण्याची मूख्य लाईन तिसर्‍यांदच फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

सरस्वती कंन्स्ट्रक्शनच्या हलगर्जीपणामुळे शहराला जोडणारी पाईप लाईन अनेक वेळा फुटत आहे. पाईप लाईन जोडणारी यंञणाही वेळेत पाईप लाईन जोडत नसल्याने शहराला पाणी पुरवठा वेळेत होत नाही.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ बरसाले डिग्रस ते पाथरी रस्ता करण्यात येत असलेल्या सरस्वती कंन्स्ट्रक्शन तर्फे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे काम करत असल्याने हा रस्ता अपघाताचा सापळा बनलेला आहे. शहरातील रायगड कॉर्नर येथून ते पाथरी कॉर्नर पर्यंत जो रस्ता खोदण्यात येत आहे.

त्या बऱ्याच दिवसापासून खोदकाम चालू असल्यामुळे रस्त्यावर धुळ पसरुन नागरीकांच्या शरिरावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. शहराला लोअर दूधना प्रकल्प धरणातून पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन शनिवारी फुटल्याने त्या पाईप लाईन मधून लाखो लिटर पाणी वाया गेले.

सरस्वती कंन्स्ट्रक्शने शहरातील पाईप तूट फुटीचे ज्या कंञाटदाराला काम दिले. तो कंञाटदारही मनाला येईल तेंव्हाच तुटलेली पाण्याची पाईप लाईन जोडणीचे काम करत असल्याने शहरातील नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सेलू शहराला लोअर दूधना प्रकल्प धरणातून पाणी पुरवठा होतो. परंतू, या धरणात केवळ अकरा टक्के जलसाठा उपलब्ध राहिला आहे. पुढिल उन्हाळ्याच्या तीन महिण्यापर्यंत हा जलसाठा पुरेल की नाही. याची शाश्वती नाही. रस्त्याच्या कामात जर असे लाखो लिटर पाणी वाया जात असेल तर भर उन्हाळ्यात नागरिकांसाठी पाण्याचा प्रश्न उग्र स्वरूप निर्माण करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.