Adul News : रस्ता कि घसरगुंडी! ब्राम्हणगाव तांडा रस्त्यावरील वाहत्या पाण्याने नागरीक, शेतकरी ञस्त

मागील वर्षी प्रधानमंञी ग्राम सडक योजने अंतर्गत आडुळ ते ब्राम्हणावमार्गे ब्राम्हणगाव तांडा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पुर्ण झाले.
bullock slippery
bullock slipperysakal
Updated on

आडुळ - मागील वर्षी प्रधानमंञी ग्राम सडक योजने अंतर्गत आडुळ ते ब्राम्हणावमार्गे ब्राम्हणगाव तांडा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पुर्ण झाले. माञ, ब्राम्हणगावहुन ब्राम्हणगाव तांडा येथे ज्याण्यासाठी करण्यात आलेला रस्ता हा तांड्याहुन वाहत असलेल्या नदीतुन करण्यात आला.

त्यात रस्त्याच्या दोन्ही बाजुने पावसाचे व नदीचे पाणी जाण्यासाठी करण्यात आलेली नाली देखील रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकरी यांनी बुजविल्यामुळे पावसाळा सुरु झाल्यापासुन पावसाचे व तांड्यातील सांडपाणी या डांबरी रस्त्यावरुनच वाहत असल्याने या डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शेवाळाचे थरच्या थर झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.