Crime News : दरोडेखोरांचा धुमाकूळ! सळई घेऊन निघालेला ट्रकच चोरला, पण...; आरोपी अटकेत

Crime
CrimeSakal
Updated on

जालना : औद्योगिक वसाहत येथून नंदूबारकडे सळई घेऊन निघालेल्या ट्रक लुटणाऱ्या चार दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून लुटलेला ट्रक, गुन्ह्यात वापरलेली कार, दोन धारदार चाकु, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण सात लाख ४१ हजार ४२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Crime
हेलिकॉप्टर-अलिशान कारच्या काळात पठाण कुटुंबाने अनोख्या पद्धतीने सून आणली घरी; गावात...

जालना औद्योगिक वसात येथून नंदूबारकडे अलीम बिस्मिल्ला पिंजरी (रा. सिंदखेडा ता. दोंडाईचा जि. धुळे) हे ता.२६ एप्रिल रोजी राजूर-भोकरदन मार्गावरून ट्रक घेऊन निघाले होते. मध्यरात्रीदरम्यान राजुर-जालना रोडवरील हॉटेल जानकी समोर त्यांच्या ट्रक पाच दरोडेखोरांनी कार आडवी लावून थांबविला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवित ट्रक चालक अलीम पिंजरी यांना मारहाण करुन त्यांचे हातपाय बांधुन बदनापूर शिवारातील एका शेतामध्ये फेकून दिले. तर सळईचा ट्रक घेऊन हे भामटे पसार झाले होते.

या प्रकरणाच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळे पथके तयार करून तपास सुरू केले होता. तपासादरम्यान खबऱ्या मार्फत स्थानिक गुन्हे शाखेला संशयित आरोपी संदर्भात माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनेश दत्तात्रय पवार (वय २५, रा. गांधीचमन, जालना) याचा छत्रपती संभाजीनगर येथून पाठलाग करत करमाड टोलनाक्याजवळ वाहन कोंडी करून अटक केली.

त्यांच्यासोबत शाहिद शकील शेख (वय २१, रा. मोदीखाना, जालना), तेजस नरेश बीडकर (वय २३, रा. गोपाळपुरा बडी सडक, जालना) याना अटक केली. शिवाय त्यांचा साथीदार सिद्दीकी शेख कौसर (वय २२ वर्ष रा. पेन्शनपुरा, जालना) याला अटक केली आहे.

Crime
BJP Executive: भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर; भंडारी उपाध्यक्ष, मोहोळ सरचिटणीस

या चौघांसह अन्य एकाने २६ एप्रिल रोजी राजुर रोडवरील एका हॉटेलवर रात्री जेवण केले होते. याच दरम्यान सळई लोड असलेला ट्रक लुटण्याचा प्लॅन आखाला. त्यानुसार या पाच संशयितांनी राजुर जालना रोडवरील हॉटेल जानकी समोर सळई घेऊन येणाऱ्या ट्रकला त्यांची कार आडवी लावून अडविला. ट्रक चालकास मारहाण करुन चाकुचा धाक दाखवुन त्याचे हातपाय व तोंड बांधुन त्याला कारमध्ये बसविले आणि सळईसह ट्रक घेऊन दाभाडी, सोमठाणा, करमाड, पिंप्री राजे, कचनेर फाटा पुढे लासुर स्टेशन परत कचनेर फाटा, अंबड, घनसांवगी, कुंभारपिंपळगाव मार्गे राजणी येथे घेऊन गेल्याची कबुली दिली.

या संशयितांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली कार, दोन धारदार चाकु, मिरची पुड, पेपर स्प्रे, रोख १६ हजार ७०० रुपये, मोबाईल, दोन बनावट नंबर प्लेट व गुन्ह्यात चोरलेला ट्रक असा एकुण सात लाख ४१, ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या चार संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हसनाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली पवार या करत आहेत.

दरम्यान ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, कर्मचारी सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, जगदीश बावणे, रुस्तुम जैवाळ, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सचिन चौधरी, फुलचंद गव्हाणे, प्रशांत लोखंडे, सुधीर वाघमारे, परमेश्वर धुमाळ, किशोर पुंगळे, रवी जाधव, कैलास चेके, सचिन राऊत, योगेश सहाणे, चालक धम्मपाल सुरडकर, रमेश पैठणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.