लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी विकास संकल्पनेतून गंगापूर (ता. लातूर) येथील रोहिणी पंकज शिंदे यांची ‘ड्रोन दीदी’ म्हणून निवड झाली आहे. मुंबई येथील आठ दिवसांच्या प्रशिक्षणातून त्यांची निवड झाली. यातूनच जिल्ह्यातील त्या पहिल्या ‘ड्रोन दीदी ठरल्या असून त्या बचत गटांच्या महिलांना ड्रोनचे प्रशिक्षण देणार आहेत. गंगापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सोमवारी (ता. २९) त्यांचा सत्कार करण्यात आला.
पिकांवर विविध कीटकनाशकांची फवारणी सुलभ पद्धतीने करता यावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करता यावी, यासाठी ड्रोनद्वारे फवारणीची संकल्पना पंतप्रधान मोदी यांनी पुढे आणली आहे. या उपक्रमात महिला बचत गटांना ड्रोन देण्यात येणार आहेत. ड्रोन चालवण्यासाठी बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित महिलांना ‘ड्रोन दीदी म्हणून संबोधले जात आहे. गंगापूर येथील रोहिणी पंकज शिंदे यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली. मुंबईत आठ दिवसाचे प्रशिक्षण घेऊन त्या जिल्ह्यातून एकमेव ‘ड्रोन दीदी ठरल्या आहेत.
त्यांच्या सत्कारप्रसंगी सोसायटीचे माजी अध्यक्ष हणमंत खंदाडे, नारायण शिंदे, अध्यक्ष सतीश धोत्रे, माजी उपाध्यक्ष सुग्रीव वाघे, उपाध्यक्ष जनार्दन फुटाणे, संचालक शशिकांत दंडीमे, शीतल शिंदे, राजश्री शिंदे, माजीद शेख, दगडू शेख व बाबू खंदाडे उपस्थित होते. या वेळी सीआरपी रेश्मा शेख यांच्यासह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. किशन तळेकर यांनी सूत्रसंचालन केले.
याचे घेतले प्रशिक्षण
प्रशिक्षणात एका दिवसात हजार एकर क्षेत्रातील पिकांवर फवारणी, पूर व अन्य आपत्ती काळात ड्रोनच्या साह्याने बाधितांना अन्न व औषधे पुरविणे आदींचे प्रशिक्षण दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. यापुढील काळात त्या जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांना ड्रोनचे प्रशिक्षण देणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.