पुणे : माझ्या हत्येचा कट रचला गेला, असा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील (Jayant Pawar), पवार कुटुंबीय यांच्यासह सांगली पोलिस अधीक्षकांवर केला आहे. याबाबत त्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, व्हिडिओ समोर आला आहे. हल्ला झाला असेल तर मी त्याचा निषेध करतो. लोकांचा रोष का होता? हे पाहणे गरजेचे आहे. व्हिडिओ प्रसिद्धी करुन त्याचे राजकारण (Pune) होत असेल तर ते चुकीचेच असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. कोणत्याही आमदाराला सुरक्षा मिळतेच. (Rohit Pawar Criticize BJP Leader Gopichand Padalkar)
पण घ्यायची की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्याशिवाय बसून अशी परिस्थिती का आली याचा विचार व्हायला हवा. भाजपचे मोठे नेते टीका करित नसल्यामुळे जे छोटे नेते असतात त्यांना संधी अशा टीका करण्यासाठी दिली जाते, असा टोला त्यांनी पडळकरांना लगावला आहे. भाजप त्यांना केवळ वक्तव्य करण्यासाठीच नेमत असते. यात पडळकर येतात की नाही हे त्यांच्या वक्तव्यावरुन कळत असल्याचे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.