RTE free admission of 2149 students registration of 249 schools in Beed education
RTE admission sakal

RTE Admission : आरटीई २१४९ विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेशाचा मार्ग मोकळा; बीड जिल्ह्यातील २४९ शाळांची नोंदणी

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील २ हजार १४९ मुलांच्या मोफत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. मोफत प्रवेशासाठी अर्ज प्रक्रीयेनंतर न्यायालयीन पेचामुळे महिनाभरही मुले शिक्षणापासून वंचित होती.
Published on

Beed News : मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील २ हजार १४९ मुलांच्या मोफत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. मोफत प्रवेशासाठी अर्ज प्रक्रीयेनंतर न्यायालयीन पेचामुळे महिनाभरही मुले शिक्षणापासून वंचित होती.

शासनाने आरटीईच्या नियमात बदल करत फेब्रुवारी महिन्यात काढलेला अध्यादेश रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने आता लवकरच प्रवेश प्रक्रीया सुरु होणार आहे.

जिल्ह्यातील २४९ शाळांमध्ये वंचित व आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २१४९ जागा आहेत. मे महिन्यात यासाठी पालकांनी साधारण सहा हजार अर्ज दाखल केले आहेत. मात्र, न्यायालयीन प्रक्रीयेमुळे मोफत प्रवेश सोडत लांबली होती. मात्र, सरकारचा अध्यादेश रद्द करत करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने आता ही प्रक्रीया सुरळीत होणार आहे.

तालुकानिहाय शाळा व आरटीई प्रवेशाच्या जागा

तालुके - शाळा -प्रवेश

  • अंबाजोगाई -४१ -२४९

  • आष्टी- १८ -८९

  • बीड - २० -२००

  • धारुर -०९- ७०

  • गेवराई -३८ -३२१

  • केज -२२ -२६७

  • माजलगांव- २ -२१५

  • परळी -२५- २४७

  • पाटोदा- ०४ -१७

  • शिरुर कासार -०८ -७७

  • बीड शहर -२६ -३४५

  • वडवणी -०८ -५३

  • एकूण -२४९ -२१४९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com