ऊसामध्ये चोर लपून बसल्याची अफवा ! गावकरी भयभीत, पोलिसांचे काॅम्बिंग सर्च

ऊसामध्ये चोर लपून बसल्याची अफवा !
Hingoli News
Hingoli Newsesakal
Updated on

आखाडा बाळापुर (जि.हिंगोली) : कळमनुरी ( Kalamnuri) तालुक्यातील चिखली शिवारात एका उसाच्या शेतामध्ये चोर लपून बसले आहेत, अशी माहिती मिळाल्याने बाळापूर पोलीस, ग्रामसुरक्षा दल व ग्रामस्थांच्या मदतीने रविवारी (ता.१५) सकाळी पूर्ण उसाचे शेत काॅम्बिंग सर्च करून पाहणी केली. कोणी आढळून आले नसल्याने शेवटी चोराची अफवा ठरली. याबाबत अधिक माहिती अशी, की आखाडा बाळापुर पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या चिखली या गावामध्ये रविवार सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांना गावातील ग्रामस्थांनी फोन करून शिवारातील उसाच्या शेतामध्ये चोर लपून बसल्याची माहिती देण्यात आली. (Rumor Of Hidden Thieve In Sugarcane In Kalamnuri, Villagers Fear)

Hingoli News
"बाळासाहेब वाघ होतेच पण आता एकच वाघ, नरेंद्र मोदी"

यावरून श्री.बोधनापोड, फौजदार बालाजी पुंड, शिवाजी बोडले, जमादार शेख बाबर यांनी सदरील उसाच्या शेतामध्ये ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांची व ग्रामस्थांच्या मदतीने पूर्ण उसाचा शेताचा काॅम्बिंग सर्च करीत पाहणी केली. परंतु एकही संशयित व्यक्ती सापडला नसल्याने पोलिसांसह ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान मागील काही दिवसापासून चिखली व परिसरामध्ये रात्री चोर येत असल्याचे घटनेने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे बाळापूर पोलिसांनी या परिसरामध्ये रात्रीची गस्त सुरू केली होती. परंतु रविवारी अचानक सकाळी उसाच्या शेतात चोर असल्याच्या अफवेने संपूर्ण उसाचे शेत पिंजून काढण्यात आला. पण त्यामध्ये कोणीही संशयित सापडून न आल्याने सदरील घटनाही अफवा ठरली आहे. यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांना भिती बाळगण्याचे काही कारण नाही, असे आवाहन केले.

Hingoli News
आता मुंबई महापालिकेवर जर कोणी राज्य करेल तर भाजप : आशिष शेलार

चिखली व परिसरातील ग्रामस्थांनी चोरांची भीती बाळगू नये. तसेच त्या परिसरावर रात्रीची गस्त सुरू करण्यात आले असून अशी संशयित व्यक्ती आढळून आल्यास बाळापूर पोलिसांशी संपर्क साधावा.

- पंढरीनाथ बोधनापोड, पोलीस निरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()