Rupali Chakankar : अवैध गर्भपात छापासत्राचे नियोजन

जिल्ह्यात ९३ सोनोग्राफी सेंटर तर ५२ अधिकृत गर्भपात सेंटर
abortion
abortionsakal
Updated on

जालना : जिल्ह्यात अवैध गर्भपात प्रकरणावरील कारवायांसंदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नाराजी व्यक्त करत छापा सत्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता जिल्ह्यात अवैध गर्भपातासह अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या ठिकाणांची माहिती काढून छापासत्र सुरू करण्याचे नियोजन पीसीपीएनडीटी समितीने सुरू केले आहे. जिल्ह्यात ९३ अधिकृत सोनोग्राफी सेंटर असून ५२ अधिकृत गर्भपात करण्याचे सेंटर आहेत.

abortion
Breast Milk : नव्याने आई झालेल्या मातांना दूध वाढवण्यास मदत करतात हे पदार्थ

जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिल महिन्यात अवैध गर्भपातासह अवैध गर्भलिंग निदानाचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. त्यामुळे जिल्ह्यात अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र, ही मोहीम काही दिवसांमध्ये थंड झाली होती. त्यात गुरुवारी (ता.दोन) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासमोर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात अवैध गर्भपाताच्या चार कारवाया केल्याचा अहवाल दाखल केला, या कामावर असमाधानी असल्याचे चाकणकर यांनी म्हटले.

abortion
IMA Announcement: ताप, सर्दी, खोकल्यावर अँटिबायोटिक्स नकोच! IMAचं डॉक्टरांना आवाहन

शिवाय अवैध गर्भपात, अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या सेंटरची माहिती काढून तत्काळ छापासत्रे सुरू करण्याचे निर्देशही श्रीमती चाकणकर यांनी दिले होते. त्यानुसार पीसीपीएनडीटी समितीही कामाला लागल्याचे चित्र आहे. समितीकडून अवैध गर्भपात आणि अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या सेंटरची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, छापासत्राचे नियोजन करण्यात येत आहे.

abortion
Period Problem : मासिक पाळीच्या कोणत्याही समस्या केवळ एका उपायाने होतील दूर

जिल्ह्यात आज घडीला ९३ अधिकृत सोनोग्राफी सेंटर आहेत. तर, ५२ अधिकृत गर्भपात करण्याचे सेंटर आहेत. आता सर्वाधिक सोनोग्राफी सेंटर आणि अधिकृत गर्भपात सेंटर हे जालना शहरासह तालुक्यात आहेत. त्यामुळे राज्य महिला आरोग्याच्या निर्देशानंतर आता पीसीपीएनडीटी समितीकडून या सोनोग्राफी सेंटर आणि अधिकृत गर्भपात सेंटरीचीही अचानक तपासणी होण्याची शक्यता आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अवैध गर्भपात व अवैध गर्भलिंग निदान सेंटरची माहिती संकलन करून छापासत्राचे नियोजन केले जात आहे. नागरिकांकडे जर अवैध गर्भपात, अवैध गर्भलिंग सेंटरची माहिती असले तर ती द्यावा. माहिती देणाऱ्याचे नाव व इतर माहिती गोपनीय ठेवली जाईल.

-डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना

तालुकानिहाय अधिकृत सोनोग्राफी सेंटर

  • जालना- ५९

  • अंबड- ११

  • भोकरदन- १२

  • परतूर- ०४

  • बदनापूर- ०३

  • घनसावंगी- ००

  • जाफराबाद- ०२

  • मंठा- ०२

  • एकूण ९३

abortion
Bombay high court verdict on abortion : गर्भपाताच्या परवानगीवर न्यायालयाने वैद्यकीय बोर्डाचा अहवाल का फेटाळला?

तालुकानिहाय अधिकृत गर्भपात सेंटर

  • जालना- ३५

  • अंबड- ०२

  • भोकरदन- ०४

  • परतूर- ०३

  • बदनापूर- ०३

  • घनसावंगी- ०१

  • जाफराबाद- ०२

  • मंठा ०१

  • नेर (ता. जालना)- ०१

  • एकूण ५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.