विमानाने ७ तासांत होणाऱ्या प्रवासास लागले दहा दिवस, अबोली परतली मायदेशी

युक्रेनमधे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या व दोन-तीन वर्षांपूर्वीपासून त्या ठिकाणी रहात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांना मोठी मदत केली.
Ukraine And Indian Students
Ukraine And Indian Students esakal
Updated on

अहमदपूर (जि.लातूर) : युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाल्याने वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना स्वदेशात परत येण्यासाठी मोठ्या अडचणींवर मात करावा लागला आहे. तालुक्यातील चोबळी (माकणी ) येथील मूळगाव असलेली अबोली रामराव पाटील यांच्या वडीलांना अहमदपूर येथील खासगी शिक्षण संस्थेत शिक्षकाची नोकरी असल्याने ते अहमदपूर (Ahmedpur) येथे राहतात. मागील वर्षी अबोली बारावी परीक्षा उत्तीर्ण झाली. भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी लागणाऱ्या नीट परीक्षेतील गुणापासून थोड्या अंतरावर राहिल्याने वैद्यकीय शिक्षण युक्रेन मध्ये घेण्याचे ठरवले व तिने १२ डिसेंबर २०२१ रोजी युक्रेनमधील (Ukraine) ब्युकोविनीयन विद्यापीठातील चरनीवंत्सयी शहर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. युद्धाच्या सुरूवातीला फारशा सूचना नव्हत्या. (Russia Ukraine War Aboli Patil Return From Ukraine In India After 10 Days)

Ukraine And Indian Students
Ukraine: मायदेशात पूर्ण करता येणार परतलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण

परंतु युद्धाची तीव्रता वाढत चालल्याने ता.२६ फेब्रुवारी रोजी आम्हाला महाविद्यालय सोडण्याची सुचना दिली गेल्याने गावाकडे जाण्याचे वेध लागले व सुरू झाला प्रवासाचा संघर्ष. महाविद्यालय ते रोमानिया हे चाळीस किलोमीटर अंतर आहे. हा प्रवास बसमधून करित होतो. परंतु युक्रेनमधेच सीमेच्या अलीकडे आठ ते दहा किलोमीटरपर्यंत देश सोडून जाणाऱ्या लोकांच्या गाड्यांची रांग लागल्याने आम्हाला येथेच सोडले गेले. या पुढील दहा किलोमीटर रस्ता पायी चालत आम्ही युक्रेन सीमा गाठली, परंतु २६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत सीमेवरच थांबावे लागले. १ ते ४ मार्च या कालावधीत रोमानियात रहावे लागले. या ठिकाणी स्थानिक सेवाभावी संस्थेनी निवास व भोजनाची सोय केली. ४ मार्च रोजी रोमानियातून संरक्षण दलाच्या विमानाने निघाले व दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात मुक्काम करून ७ मार्च रोजी पुणेमार्गे अहमदपूरला पोहोचले, असे सांगत अबोली सुटकेचा निःश्वास सोडला. माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी कठीण परिस्थितीत संयम राखून सुखरूप मायदेशी परत आलेल्या अबोली पाटील यांचा सत्कार केला. (Latur)

Ukraine And Indian Students
पाकिस्तानमध्ये विरोधी पक्ष इम्रान खान यांच्या विरोधात, २४ तासांचा अल्टिमेटम

युक्रेनमधे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या व दोन-तीन वर्षांपूर्वीपासून त्या ठिकाणी रहात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थ्यांना मोठी मदत केली. थंडीची नैसर्गिक आपत्ती, नागरिकांच्या गर्दीचे आमच्यावर दडपण असले तरी सुखरूप पोहोचणार अशी खंबीर मानसिकता व वेळो वेळी पालकांशी भ्रमणध्वनी द्वारे झालेल्या संवादाने आम्ही कठीण परिस्थितीवर मात करून मायदेशी परतलो.

- अबोली पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.