साईंबाबांची ‘पाथरी’च जन्मभूमी !  काय आहेत पुरावे वाचा...

file photo
file photo
Updated on

पाथरी (जि.परभणी) : साईबाबांच्या जन्मभूमीवरून शिर्डीकरांनी वाद निर्माण केला असला तरी, श्री साईबाबाची पाथरी हीच जन्मभूमी असल्याचे अनेक पुरावे श्री साई स्मारक समितीकडे उपलब्ध आहेत. यावरून साईबाबाचा जन्म पाथरी येथेच झाल्याच्या दाव्याला पुष्टी मिळते.

मुळत: श्री साईबाबा हे दत्ताचे अवतार होते. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृतात तसा स्पष्ट उल्लेख आहे. या मूळ संस्कृत ग्रंथाची मूळ रचयिता श्री शंकर भट्टाजी होते. 'मी श्री साईनाथ नावाने अवतार घेईन व अल्लाह मालिक हा शब्द ओठी ठेवून माझे कार्य करीन.' त्याच प्रमाणे श्री गो. र. दाभोलकर लिखित जगमान्य श्री साई सच्चरित (श्री साईबाबा संस्थान शिर्डी, आठवी आवृत्ती, प्रकाशन १९७२) मध्ये साईबाबा यांचे परमभक्त श्री म्हाळसापती यांना एक गोष्ट सांगितल्याचा उल्लेख आहे. श्री साईबाबा त्यात सांगतात.. ‘म्हाळसा...! माझा जन्म पाथरी येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. बाल्यावस्थेत मी एका सुफी फकिराबरोबर निघालो.’ श्री साई सत्चरित्रातील त्यांच्या जन्माचा व जातीचा खुलासा दस्तुरखुद्द श्री साईबाबानींच केलेला असल्यामुळे याशिवाय काही पुरावा असण्याची तशी गरज नाही. दुसरा संदर्भ म्हणजे १९२५ मध्ये प्रकाशीत केलेल्या श्री भक्ती सारामृत या ग्रंथात श्री साईबाबा एका ब्राह्मण कुटुंबात पाथरी यैथे जन्मल्याचा दाखला दिला आहे. अहमदाबादचे भक्त श्री स्वामी शरणानंद यांना साईबाबांचा सहवास लाभला. त्यांनीही साईबाबांच्या जन्माचा व ते हिंदू असल्याचा निर्वाळा दिला. स्वामी शरणानंदाची समाधी अहमदाबादेत आहे. बी. व्ही. नरसिंह स्वामी यांच्या ‘डिव्हाईन आँफ साईबाबा’ (भाग १) या ग्रंथात पान (क्र. ९२) वर पाथरी येथील जन्माचा उल्लेख आढळतो. श्री साईबाबा संस्थांन शिर्डीने प्रकाशीत श्री साईलीला या स्पुटलेखात (प्रसिद्धी एप्रिल १९२५ ,पान १७९) साईबाबांचा जन्म पाथरी (जि. परभणी) येथील ब्राह्मण कुटुंबात झाल्याचा उल्लेख केला आहे. श्री साईबाबांच्या या पवित्र जन्मस्थळी त्याच्या उत्खननाच्या वेळी अनेक वस्तू सापडल्या. (उदा. धान्य दळणासाठी दगडाचे जाते, दिवे लावण्याच्या खापराच्या पणत्या, पुजेची भांडी आणी सर्वात अद्भूत गोष्ट सापडली, ती म्हनजे तीन फूट आकाराची महादेवाच्या पिंडीच्या आकाराची उदी. या उदीला अजूनही कापराचा गंध येतो.)


जन्मस्थळाच्या पुराव्यासाठी प्राचीन पुस्तकांचे दाखले
१) बी. व्ही. नरसिंहस्वामी डिव्होटीज एस्पिरिअंसिस ऑफ साईबाबा (इंग्रजी), भाग-१, ऑल इंडिया साई समाज, मद्रास. तिसरी आवृत्ती १९६५, पान (क्र.४३,४८) वर.
२) एम. के. गांधी, इन सर्च ऑफ दी सुप्रीम (इंग्रजी), भाग १, नवजीवन पब्लिशिंग हाऊस, अहमदाबाद, १९६१, पान (क्र.१४८)
३) एरिक एच. एरिकसन, गांधीज टूथ (इंग्रजी), डब्ल्यू.डब्ल्यू. नॉर्टन आणि कं. इक, न्युयार्क १९६९,पान  (क्र. ९)
४)बी. व्ही. नरसिंहस्वामी, डिव्होटीज, एस्पिरिअंसिस ऑफ साईबाबा, भाग १, पान  (क्र. ९२)
५) गो. र. दाभोलकर, श्री साईसच्चरित, श्री साईबाबा संस्थान, शिरडी, ८ वी आवृत्ती, १९७२, अध्याय
६) पृ.१३ ६. स्वामी साईशरणानंद, श्री साईबाबा (गुजराती), ६ वी आवृत्ती, १९६६, पृ. १७: (इंग्रजी), स्टलिंग पब्लिशर्स प्रा. लि., नवी दिल्ली, १९९७, पृ.१३ आणि आर. बी. पुरंदरे, डिव्होटीज एक्स्पिरिअसिस ऑफ साईबाबा, भाग १, पान  (क्र.१०४, ११४) वर.
७) बी. व्ही. नरसिंहस्वामी, तथैव, भाग २, पान  (क्र.४६)
८) गो. र. दाभोलकर, श्री साईसच्चरित
९) तत्रैव, हरी सीताराम दीक्षित यांचा उपोद्घात, पान  (क्र. १)
१०) श्री साईलीला, स्फुट लेख, एप्रिल १९२५, पान  (क्र.१७९०)
११) बी. व्ही. नरसिंहस्वामी, लाईफ ऑफ साईबाबा (इंग्रजी),भाग १, ऑल इंडिया साई समाज, मद्रास,१९५५,पान  (क्र.१३-१४)
१२) तवैत्र, पान  (क्र.१२)
१३) स्वामी साईशरणानंद, २५ ऑगस्ट, १९८२ मध्ये बधवारी रात्री १२ वाजन २० मिनिटांनी ब्रता झाले. त्यांचा नश्वर देह १४/१५ प्रकृतिकुंज सोसायटी, न्य शारदा मंदिर रोड, १५ अहमदाबाद ३८०:०९ रोधील आवारात पुरण्यात येऊन त्याचेवर समाधी उभारण्यात आली.
१४) श्री साईलीला. सप्टेंबर १९७५ पान  (क्र.४) वर
१५) स्वामी साईशरणानद, सोय (गुजरात), १९६६. (इंग्रजी), अहमदाबाद ३८०:०९ रोधील आवारात पुरण्यात येऊन त्याचेवर समाधी उभारण्यात आली.
१४) श्री साईलीला. सप्टेंबर १९७५ पृ.४. वर
१५) स्वामी साईशरणानद, सोय (गुजरात), १९६६. (इंग्रजी), १९९९७
१६) तत्रैय (गुजराती). पान  (क्र.१४.१५) (इंग्रजी), पान (क्र.१०.११)
१७) तत्रैय (गुजराती), प्र. ६ (इंग्रजी) पान  (क्र.३५९-३७२)
१८) श्री साईलीला, जुलै-सप्टेंबर १९४२, पान  (क्र.३५९-३७२)
१९) एस. बी. दीक्षित भारतीय खगोलशास्त्राचा इतिहास, दुसरी आवृत्ती, १९३१ पान  (क्र.२६७.२६९ व २७८)
२०) लेफ्टनंट कर्नल सर पुल्सले हेग, दी हिस्टरी ऑफ दी निझामाशाही किंग्स ऑफ अहमदनगर, (इंग्रजी), ब्रिटिश इंडिया प्रेस, मुंबई १९२३, पृ.७ (टीप)
२१)प्रो. एच. के. शेरवानी व डॉ. पी. एम. जोशी, हिस्टरी ऑफ मेडिव्हल डेक्कन (१२९५-१७२४), (इंग्रजी), भागप, गव्हर्नमेंट ऑफ आंध्रप्रदेश, १९७५, पान  (क्र.२२५-२२८)
२२) लेफ्टनंट कर्नल जॉन ब्रिग, हिस्टरी ऑफ दी राइज ऑफ महामेडन पावर इन इंडिया टिल. ए. डी. १६१२(इंग्रजी), भाग  ३, लॉगमन रीस, ऑर्म, ब्राउन, व ग्रीन, १८२९, पान  (क्र.१८९-९०)
२३) प्रो. एच. के. शेरवानी व डॉ. पी. एम. जोशी, तथैव, पान  (क्र.२२५- २२८)
२४) लेफ्टनंट कर्नल सर वुल्सले हेग, तथैव, पान  (क्र.७) (टीप)
२५) ऑक्टोबर १९९९ पासून दिनकरराव चौधरी यांचा मुक्काम. संत साईबाबा मार्गावर एसटी स्थानकाच्या पाठीमागच्या बाजूस स्वतःच्या इमारतीत असतो.
२६) या संशोधन लेखात पुढे उद्धृत केलेला भुसारी कुटुंबाचा वंशवृक्ष पाहावा.
२७) प्रस्तुत लेखक तेरा वर्षांनंतर १९९३ मध्ये पाथरीस गेला तेव्हा पाथरी नगरीचा चेहरामोहरा त्यास बदलेला आढळला. पहिला ग्रामीण देखावा जावून त्या ऐवजी अनियोजित शहरीकरण झालेले दिसले. शहरातून एक हमरस्ता जातो व साखर कारखाना स्थापन झालेला आढळतो. गावाची संख्या तिप्पट वाढली असली तरी सुविधांच्या विकासाचा अभाव दिसतो.
२८) बी. व्ही. नरसिंहस्वामी, तथैव, भाग १, पान  (क्र.१३)
२९) एम. व्ही. प्रधान, श्री साईबाबा ऑफ शिरडी (इंग्रजी), श्री साईबाबा संस्थान. शिरडी. ७ वी आवृत्ती. १९७३, पान (क्र.२५ ३०)


सरकार गॅझेटमध्ये साई जन्मस्थळाची नोंद
 वेगवेगळ्या पुराव्यानिशी पाथरी (जि. परभणी) हे संत साईबाबांचे जन्मस्थळ आहे हे सिद्ध होत आहे. त्यातच आता १९६२ चा शासकीय दस्ताऐवज समोर आला आहे. सरकारी गॅझेटमध्ये पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. इतकेच काय तर साईबाबांचा पाथरी ते शिर्डीपर्यंतच्या प्रवासाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. पाथरी हे अहमदनगरच्या निजामशाही घराण्याच्या पूर्वजांचे वतनाचे गाव असल्याचादेखील यात उल्लेख आहे. त्याच बरोबर या गॅझेटमध्ये पाथरी हे प्राचीन गाव असून तेथे प्राचीन हत्तीचा तलावदेखील असल्याचा उल्लेख आहे. या पुस्तकाच्या पान क्रमांक ६२२ वर शिर्डीचे संत साईबाबांचे जन्मगाव असावे, असा उल्लेख आहे. भुसारी कुटुंबात जन्म घेतलेल्या या संतास सेलूला गेले असतांना वेडा समजून हाकलून लावले. त्यांना दगड मारल्यामुळे कपाळाला खोच पडली. म्हणून साईबांबानी कपाळावर पट्टी बांधली. ही पट्टी त्यांच्या कपाळावर कायमचीच राहिली. ही पट्टी बाबासाहेब नावाच्या संताने बांधली. तेव्हापासून साईबाबांनी बाबासाहेबांना आपले गुरू मानले. बाबासाहेबांचे मंदिर सेलू येथे असून त्यांचा काळ १७१५ ते १९०९ असा आहे, असा उल्लेख या गॅजेटमध्ये करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.