राज्य उत्पादन शुल्कची विक्रमी वसुली 

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : जिल्ह्यात अवैध देशी दारु, हातभट्टी आणि सिंदी विक्री करणाऱ्यांविरूद्ध धडक कारवाई करत राज्य उत्पादन शुल्क विभागाने उदिष्टापेक्षा अधिक लक्ष पुढे ठेवत तब्बल सोळा कोटीचा महसुल अधिक जमा केला.

मराठवाड्यात नांदेड जिल्हा हा अव्वल ठरला आहे. सन २०१८- १९ मध्ये ३१६ कोटी ५१ लाख २८ हजार १६८ रुपयाचा महसुल जमा केला. परंतु सन २०१९- २० मध्ये याहीपुढे जावून  ३३२ कोटी ४७ लाख ९० हजार ५५५ रुपयाचा महसुल जमा केला. जवळपास १५ कोटी ९६ लाख ६२ हजार ३८७ रुपयाची तफावत आहे.

मोहफुले मुबलक प्रमाणात 

नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर तसेच धर्माबाद व देगलूर आणि बिलोली या तालुक्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टी व सिंदीची विक्री केल्या जाते. यातील किनवट व माहूर तालुक्यात घनदाट जंगल असल्याने या जंगलात मोहफुले मुबलक प्रमाणात मिळत असते. अनेकांचा उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ही मोहफुले वेचुन विक्री केल्या जाते. या फुलापासून हातभट्टी दारु तयार केली जाते. मात्र अशी दारु तयार करणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग सतत कारवाई करत असते.

कोट्यावधी रुपयाचा मुद्देमाल जप्त

अनेकांना पकडून कोट्यावधी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत. तसेच बऱ्याच ठिकाणी बनावट दारु तयार करणारे कारखाने उध्दवस्त करण्यात आले आहेत. एप्रील २०१९ ते जानेवारी २०२० अखेर पर्यंत या विभागाने जिल्हाभरात अवैध धंद्यावर कारवाई करत अनेकांवर गुन्हे दाखल केले.

आकडे बोलतात-  


ँ सन २०१९- २० मध्ये एक हजार एक, तर ३८० बेवारस गुन्हे, यात एक हजार चार जणांना अटक केली. तसेच १३७ वाहने जप्त केली, जवळपास एक कोटी ४१ लाख ६७ हजार ७७४ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
ँ सन २०१८- १९ मध्ये ९८६ जणांवर तर ३५५ बेवारस गुन्हे दाखल, ९९३ जणांना अटक करून वर्षभरात १०२ वाहने जप्त करून ८२ लाख ३१ हजार ११० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 

बिअर मद्य विक्री  : 
सन २०१९- २० मध्ये २७ लाख ४४ हजार १३६ लीटर तर सन २०१८- १९ मध्ये २५ लाख ८० हजार ८६ लिटर विक्री करून एक लाख ६४ हजार ५० लीटरची अधीक विक्री करण्यात आली आहे. जवळपास सहा टक्याने वाढ झाली आहे. 

विदेशी मद्य विक्री  
सन २०१९- २० मध्ये २६ लाख ७६ हजार ४६२ लीटर तर सन २०१८- १९ मध्ये २३ लाख ९५ हजार ३४ लीटर विक्री करून ११. ७५ टक्याची वाढ करण्यात आली.
 
देशी मद्य विक्री :
 सन २०१९- २० मध्ये एक कोटी १८ लाख ८७ हजार २३८ लिटर तर सन २०१८- १९ मध्ये एक कोटी ११ लाख ८५ हजार ७४३ लीटरची विक्री करून यात जवळपास सहा टक्याने वाढ झाली आहे. 

कारवाईचे सत्र सुरू राहील


जिल्ह्यात अवैध देशी दारु, परराज्यातील बनावट विदेशी मद्य, हातभट्टी व सिंदी विक्री करणाऱ्यांवर आमची करडी नजर आहे. जिल्ह्याती असे अवैध धंदे करणाऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविले आहे. वेगवेगळ्या पथकांद्वारे धडक कारवाई सुरू आहे. जिल्ह्याला वसुलीचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करून एक नवा विक्रम नांदेडच्या नावे झाला आहे. नांदेड जिल्हा हा महसुलात मराठवाड्यात अव्वल ठरला आहे. येणाऱ्या काळातही अशाच पध्दतीने कारवाईचे सत्र सुरू राहील. 
- निलेश सांगडे, अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नांदेड.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.