नांदेड : सीएए व एनआरसीच्या विरोधात भडकावू भाषण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मुंबईच्या सलमानला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी मुंबईतून अटक केली. त्याच्यावर इतवारा पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. चार) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
देगलूर नाका परिसरात असलेल्या बरकत कॉम्पलेक्ससमोर एसीसी व एनआरसी कायद्याविरोधात मुस्लीम समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलन मंचावरून मुंबई येथील मोहमद सलमान अहेमद सईद अहेमद (वय २८) याने केंद्र सरकार व पंतप्रधान यांच्याविरुद्ध भाषणातून तिखट वक्तव्य केले होते. त्याच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे संतापाचे वातावरण पसरले. या प्रकरणी भाजपचे महानगरप्रमुख प्रविण साले यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करावा अशी मागणी इतवारा पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली होती.
हेही वाचा - `मास्तर’ तुम्ही तुमचीच इभ्रत...
सलमानला मुंबईतून केली अटक
या निवेदनाची दखल घेत पोलिस हवालदार शिवसांब मारवाडे यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात प्रक्षोभक भाषण व भाषणातून तिथावणी देणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गीते करत होते. या सलमानच्या पत्त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपले फौजदार दत्तात्र्य काळे यांच्या पथकाला मुंबई येथे पाठविले. वरिष्ठ अधिकारी व सायबर सेलचा आधार घेत हे पथक मंबईमध्ये बुधवारी धडकले. भडकावू वक्तव्य करणाऱ्या मोहमद सलमान याच्यापर्यंत पोचले. रात्री त्याला मुंबई पोलिसांच्या मदतीने त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल्याचे पथकानी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. त्याला गुरुवारी (ता. सहा) सायंकाळी नांदेडला आणण्यात आले आहे. त्याने यापूर्वी कुठेकुठे भडकावूनभाषण केले त्याची चौकशी सुरू असून तो उच्च शिक्षीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
येथे क्लिक करा - आता... छेडछाड कराल तर बसणार ‘शॉक’
देगलूर नाका भागातील एका पुढाऱ्याचा समावेश
याच गुन्ह्यात देगलूर नाका भागातील एका मुस्लीम पुढाऱ्याचे नाव अले असून त्याचीही इतवारा पोलिस चौकशी करत आहे. मात्र दाखल झालेल्या या गुन्ह्यातील कलम हे जामीनपार असल्याने यांचा जामीन लगेच होण्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे याबाबत अधिकची चौकशी करत आहेत. या प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांना दखल घेऊन शेवटी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.