मराठा समाजाचा उमेदवार उभा करण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध : छगन शेरे

परभणी येथे काही स्वयंघोषित मराठा नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार देण्याचे घोषित करण्यात आले होते या बैठकी दरम्यान संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा असल्याचेही सांगण्यात आले
Sambhaji Brigade opposed to fielding Maratha community candidate for lok sabha election Chhagan Share
Sambhaji Brigade opposed to fielding Maratha community candidate for lok sabha election Chhagan ShareSakal
Updated on

जिंतूर : परभणी येथे काही स्वयंघोषित मराठा नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार देण्याचे घोषित करण्यात आले होते या बैठकी दरम्यान संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा असल्याचेही सांगण्यात आले मात्र सकल मराठा समाजाचा उमेदवार उभा करण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे यांनी बुधवारी (ता.०३) कार्यालयात आयोजीत बैठकीत स्पष्ट केले.

मत विभागणी टाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संभाजी ब्रिगेडच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटीसाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यानिमित्त शहरातील संभाजी ब्रिगेड कार्यालयात आयोजित बैठकीत छगन शेरे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे,शिवाजी मोकाशे आदी उपस्थित होते.

यावेळी शेरे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या अभूतपूर्व मोर्चांनंतर सकल मराठा समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची मागणी पुढे आली.त्यासाठी बैठकांचे सत्रही पार पडले.मात्र अंतर्गत बंडाळी व मराठा मतदारांची मतविभागणी लक्षात घेता मराठाद्रोही भाजपच्या महायुतीच्या उमेदवाराला याचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने अपक्ष उमेदवार उभा करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

मात्र अजूनही काही लोक जाणीवपूर्वक सकल मराठा समाजाच्या वतीने परभणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभा करण्यात यावा अशी भूमिका घेत आहेत.त्यांची ही भूमिका संदिग्ध व अनाकलनीय आहे.या भूमिकेमुळे आदरणीय मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व मान्य नसल्याचे उघड होत आहे.

परिणामी मराठा मतदान विभागले जाऊन भाजपप्रणीत महायुतीचा उमेदवार निवडून येण्यास सकल मराठा समाजाची ही आत्मघातकी भूमिका पोषक ठरेल. तेव्हा मतविभागणी टाळण्यासाठी व मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या भाजपप्रणीत महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे ही जाहीर भूमिका आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने घेत असल्याचे यावेळी छगन शेरे यांनी सांगितले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.