वसमतला संभाजी ब्रिगेड आक्रमक; पिक कापणी प्रयोग कागदावरच केल्याचा आरोप

संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिक व उडीद पीकांचे पिक कापणी प्रयोगाची माहिती २० सप्टेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी यांना मागीतली होती.
वसमतला संभाजी ब्रिगेड आक्रमक; पिक कापणी प्रयोग कागदावरच केल्याचा आरोप
वसमतला संभाजी ब्रिगेड आक्रमक; पिक कापणी प्रयोग कागदावरच केल्याचा आरोपnagesh chavan vasmat
Updated on

वसमत : तालुक्यात मुग व उडीदाचे पिक कापणी प्रयोग कागदावरच केल्याचा आरोप करुन खरोखर प्रत्यक्षात प्रयोग केले असल्यास त्या शेतकर्यांची व सर्व्हे नंबरची माहिती द्यावी तसेच ' नोट कँम अँप व्दारे काढण्यात आलेले फोटो सुध्दा देण्यात यावेत या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून शुक्रवार ता.२७ तालुका कृषी अधिकारी कार्यालयात टाळेबंद आंदोलन सुरु केले आहे.

जोपर्यंत संबंधित माहिती मिळणार नाही तोपर्यंत येथून पुढचा मुक्काम हा तालुका कृषी कार्यालयातच करणार असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिक व उडीद पीकांचे पिक कापणी प्रयोगाची माहिती २० सप्टेंबर रोजी तालुका कृषी अधिकारी यांना मागीतली होती.

परंतू माहिती देण्यात न आल्याने गुरुवारी ता.२६ तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन टाळेबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज संभाजी ब्रिगेड चे हिंगोली जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर,‌ वसमत विधानसभा अध्यक्ष अलोक पाटील इंगोले,‌ तालुका उपाध्यक्ष मारोती कर्हाळे, कृष्णा जाधव, हर्षवर्धन कदम यासह कार्यकर्त्यांनी तालुका कृषी कार्यालयास टाळे लावले. त्यानंतर कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरु केले.‌

विशेष म्हणजे पीक विमाच्या अनुषंगाने पीक कापणी पुर्वी पीक कापणी प्रयोग करुन उंबरठा अहवाल आणि पिक कापणी प्रयोग अहवाल यातून नूकसानीची टक्केवारी कळते मात्र कार्यालयात बसून पीक विमा कंपन्यांच्या सोयीचे अहवाल बनवले जातात असा आरोप करण्यात आला असून मुग व उडीद पिकाचा जोपर्यंत पिक कापणी प्रयोगाची शेतकरी व सर्व्हे नंबर नुसार माहिती मिळणार नाही तोपर्यंत कार्यालयातच मुक्काम करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

मागील वर्षी एकट्या वसमत तालुक्यातून 62 कोटी प्रिमीयम विमा कंपनीला मिळाले आणि शेतकय्रांना केवळ १७ कोटी रुपये विम्यापोटी वाटप करण्यात आले. म्हणजेच केवळ वसमत तालुक्यातून ४५ कोटी रुपये विमा कंपनीने कमावले. कृषी विभाग व विमा कंपनीचे साटेलेटे असून यात शेतकय्रांना लाभापासून वंचित ठेवले जात आहे.

- आलोक इंगोले पाटील, विधानसभा अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.