शेतकऱ्यांची वीज तोडून त्रास द्याल तर याद राखा : निलंगेकरांचा इशारा

महावितरण कर्मचारी सरसकट शेतकऱ्यांचे ट्रान्सफार्मर बंद करून सक्तीची वसूली करत आहेत.
sambhaji patil nilangekar
sambhaji patil nilangekar
Updated on

निलंगा (जि.लातूर) : नैसर्गिक आपत्तीच्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे ऐन रब्बी हंगामात विज कनेक्शन तोडू नये. अन्यथा महावितरण कार्यालयातील अधिका-यांना घेराव घालू असा इशारा माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना निवेदनाद्वारे दिला आहे. अगोदरच अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकाला लागणारी विज खंडीत करून त्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम हे सरकार करत आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू व शेंगा या पिकांना पाणी देण्याचा मोसम असताना थकित विज बिलाच्या वसूली पोटी महावितरणकडून (Mahavitaran) शेतीपंपाचे कोणतीही पूर्व सूचना (Latur) न देता गावागावातील विज कनेक्शन तोडून ट्रान्सफार्मर बंद केले जात आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून रब्बी हंगामातील पिके वाळून जात आहेत. (sambhaji patil nilangekar said, don't disconnect Farmers' electricity)

sambhaji patil nilangekar
Beed|महिलांनी केला तरुणीचा विनयभंग, शिवीगाळ करुन दिली धमकी

एकीकडे गावातील शेती पंपाच्या थकीत विज बिलांपैकी ६७ टक्के विजबिल माफ केल्याची घोषणा राज्य सरकारकडून केली असली तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यातच उर्वरित ३३ टक्के विजबिल भरणा करावा, असे परिपत्रक असताना सक्तीची वसूली करत असून नाही भरणाऱ्या शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण पिके वाळून जात आहेत. सक्तीची वसूली आणि राज्य शासनाची रोज बदलत असलेली वीज जोडणी संदर्भातील नियम यावरही निलंगेकर यांनी टीका केली आहे. महावितरण कर्मचारी सरसकट शेतकऱ्यांचे ट्रान्सफार्मर बंद करून सक्तीची वसूली करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचे कामही हे जुलमी सरकार करत आहे अशी टीका निलंगेकर यानी केली आहे.

sambhaji patil nilangekar
Aurangabad|भरस्त्यात पोलिसाचा दोरीने आवळला गळा, औरंगाबादेत खळबळ

महावितरण अधिकारी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडून त्रास देत असतील तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारू व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देऊ असा इशारा आमदार निलंगेकर यानी निवेदनातून दिला आहे. सध्या वीज कंपनीकडून राजरोसपणे शेतीचे कनेक्शन शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता तोडला जात असल्याने राज्य शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांतून असंतोष निर्माण झाला आहे. शिवाय खरीप हंगाम अतिवृष्टीने गेला तर रब्बी हंगाम शासनाच्या जुलमी वसूलीमुळे हातचा जाणार आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे. या बाबीचा भारतीय जनता पार्टीकडून धिक्कार करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()